लग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर...

Crime News In Marathi: एका महिलेने IPS अधिकाऱ्यांला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याची धमकी दिली आहे. तसंच, लग्न करण्याचा दबावही टाकला होता.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 22, 2023, 02:56 PM IST
लग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर... title=
IPS officer blackmail over fake rape case by woman friend news in marathi

Crime News Today: दोघ एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण होते. तरुण पोलिस दलात IPS होताच मैत्रिणीची नियत फिरली. महिलेचे तरुणाला हनीट्रॅपमध्ये फसवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजस्थानात ही घटना घडली आहे. सुरुवातीला तरुण RAS पदावर कार्यरत होता. त्यानंतर तो IPS पदावर रुजू होताच कथित महिला डॉक्टरने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर या तरुणासाठी ती तिच्या पतीलाही सोडायला तयार होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मित्र IPS पदावर भरती झाल्यानंतर महिला डॉक्टरने त्याच्या लग्नासाठी दबाव आणला. जर लग्न नाही केलं तर बलात्काराच्या खोट्या आरोपात फसवेन, अशी धमकीदेखील दिली होती. इतंकच नव्हे तर, ही महिला तिच्या पतीलाही सोडायला तयार झाली होती. अखेर या प्रकरणाला वैतागून तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, जयपूरच्या मालवीयनगर येथे राहणाऱ्या 33 वर्षीय राजेश कुमार मीना हे 2020मध्ये डूंगरपूरमध्ये RASपदावर कार्यरत होते. त्याचवेळी आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉ. प्रियांकासोबत त्याची ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्रीदेखील झाली होती. प्रियंका राजेशसाठी रोज घरुन डबादेखील घेऊन येत होती. जेव्हा राजेशला गरज होती तेव्हा तिने त्याला 3 लाख रुपयांची मदत देखील केली होती. नंतर राजेशने ते पैसे परत केले होते. 

2021मध्ये राजेशची पोस्टिंग SDMपदावर झाली. त्यानंतरही डॉक्टर महिला त्याला रोज भेटण्यासाठी येत होती. त्यानंतर राजेश IPS बनताच प्रियांकाने त्याला लग्नासाठी विचारले. ती पतीला घटस्फोट देऊन राजेशसोबत लग्न करायला तयार होती. मात्र, राजेशने तिला नकार दिला. त्यानंतर तिने सतत त्याला ब्लॅकमेल 
करायला सुरुवात केली. 

राजेश यांनी पुढे म्हटलं आहे की, मे 2023मध्ये कुटुंबीयांनी त्यांचे लग्न ठरवले होते. त्यानंतर डॉ. प्रियांकाने त्यांना धमकवण्यास सुरु केले. ती त्याला सतत टॉर्चर करायला लागली. प्रियंकाने IPS राजेश यांना पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकला. इतकंच नव्हे तर, राजेश यांना खोट्या बलात्काराच्या आरोपात फसवण्याची धमकी देत त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची मागणी केली. 

या सगळ्या रोजच्या त्रासाला वैतागून राजेश यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.