'आधी तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा' - आता अवघ्या सेकंदात मिळणार रेल्वे तिकीट

  'डिजिटल पेमेंट'ला चालना देण्यासाठी आणि तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी रेल्वेने ' बुक नाऊ पे लेटर' ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.  

Updated: Aug 11, 2017, 11:56 AM IST
'आधी तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा' - आता अवघ्या सेकंदात मिळणार रेल्वे तिकीट  title=

नवी दिल्ली:   'डिजिटल पेमेंट'ला चालना देण्यासाठी आणि तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी रेल्वेने ' बुक नाऊ पे लेटर' ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.  

ई पेलेटद्वारा आता रेल्वे प्रवासी एका क्लिकने व ओटीपीच्या सहाय्याने अवघ्या काही सेकंदात आपलं तिकीट आरक्षित करू शकणार आहेत.  त्यामुळे पूर्वीपेक्षा क्रेडीट आणि नेट बॅकींगपेक्षा हा नवा पर्याय खूपच सोपा ठरणार आहे. 

पूर्वी रेल्वेचे बुकिंग करताना साईन अप करून पॅन किंवा आधार कार्डचा क्रमांक, सारी वैयक्तिक माहिती भरावी लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ होती. पण नव्या सुविधेमुळे वारंवार साईन अप करण्याची आता गरज नाही. असेही यावेळी रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर या नव्या सुविधेची माहिती दिली आहे.  तिकीट आरक्षित केल्यानंतर प्रवासी 14 दिवसांमध्ये त्याचे पैसे ऑनलाईन स्वरूपात देऊ शकतील. त्यामुळे ही नवी प्रक्रिया कॅशलेस आणि डिजिटल होण्यास मदत होईल. 

तात्काळ तिकिट बुक करणार्‍यांसाठीही ' पे ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार पेमेंट गेट वे ऐवजी आता ग्राहकांना जेव्हा घरी तिकिटं मिळतील तेव्हाच रोख  किंवा कार्डच्या स्वरूपातही पैसे देता येतील.