चारधाम यात्रेसाठी IRCTC चं टूर पॅकेज...पाहा कोरोना काळात कशी घडवणार तीर्थयात्रा?

तुम्हाला जर चारधाम यात्रा करायची असेल, तर तुम्हाला IRCTC ने तुमच्यासाठी एक खास पॅकेज आणलं आहे. या एका पॅकेजमध्ये तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामचं दर्शन भाविकांना करता येणार आहे.

Updated: Mar 17, 2021, 06:29 PM IST
चारधाम यात्रेसाठी IRCTC चं टूर पॅकेज...पाहा कोरोना काळात कशी घडवणार तीर्थयात्रा?

मुंबई : तुम्हाला जर चारधाम यात्रा करायची असेल, तर तुम्हाला IRCTC ने तुमच्यासाठी एक खास पॅकेज आणलं आहे. या एका पॅकेजमध्ये तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामचं दर्शन भाविकांना करता येणार आहे.

IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार ११ रात्री आणि १२ दिवसांचं हे टूर पॅकेज असेल. या चारधाम टूर पॅकेजची किंमत ४३ हजार ८५० रूपये आहे. जर दोन धाम यात्रा करायच्या असतील, तर त्याची किंमत ३७ हजार रूपये असेल.

कोरोनाचा काळ असल्यामुळे एका ग्रूपमध्ये असणाऱ्या लोकांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. सध्या तरी या टूरच्या पॅकेजमध्ये एका ग्रूपमध्ये केवळ २० जणांचाच समावेश असेल. या पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोयही केली जाणार आहे.

या यात्रेला तुम्हाला IRCTC मार्फत जायचं असेल, तर irctctourism.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करू शकता.