Isha Ambani Reliance Brand Limited: आपल्या ओळखीत अनेकांचा महिन्याचा पगार 20, 30, 50 ते 1, 2 लाखांपर्यंत असू शकतो. पण एका दिवसाचा पगार 1 लाख 30 असलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? हो. मुकेश अंबानी यांचे जवळचे मित्र आणि ईशा अंबानीच्या कंपनीच्या पहिल्या कर्मचाऱ्याला इतका गलेल्लठ्ठ पगार दिला जातो. ईशा अंबानीच्या कंपनीत नोकरी करणारा पहिला कर्मचारी कोण आहे? तो काय करतो? ईशा अंबानी त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे का मानते याबद्दलही जाणून घेऊया.
दर्शन मेहता असे यांचे नाव असून ते मुकेश अंबानी यांच्या जवळते मानले जातात. अलीकडेच मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील कर्मचारी दर्शन मेहताचे नाव समोर येत आहे. दर्शन मेहता हे ईशा अंबानीच्या कंपनीतील पहिले कर्मचारी आहेत. सध्या ईशा अंबानी यांच्या कंपनीकडून दर्शन मेहता यांना दररोज सुमारे 1.3 लाख रुपये मानधन दिले जाते. सन 2020-21 मध्ये दर्शन मेहता यांना 4.89 कोटी रुपये वार्षिक पगार मिळाला. डीएनएने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दर्शन मेहता हे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. दर्शन मेहता यांनी त्रिकाया ग्रे अॅडव्हर्टायझिंगमध्ये वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. जी नंतर WPP ने घेतली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस, टॉमी हिलफिगर, गँट आणि नॉटिका यासह अनेक स्पोर्ट्सवेअर ब्रँड भारतात लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
अब्जाधीश मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी 2007 मध्ये सुरू झालेल्या RBL (रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड) चे व्यवस्थापन करत आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, सध्या कंपनीचे मार्केट कॅप 125 अब्ज डॉलर्स इतके आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत RBL ची 67 हजार 634 कोटी रुपयांची विक्री झाली होती. याशिवाय कंपनीचा नफा 2 हजार 259 कोटी रुपयांवरून 2 हजार 400 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रिलायन्स रिटेल कंपनी अन्न, खेळणी, कपडे, पादत्राणे, किराणा इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे. त्यांचे देशभरात 18 हजाराहून अधिक स्टोअर्स आहेत आणि 2,45,000 हून अधिक कर्मचारी आहेत.
कंपनीचे सध्या 249 दशलक्ष नोंदणीकृत ग्राहक आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत, रिलायन्स रिटेल 65.6 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या 7 हजारहूंन अधिक शहरांमध्ये 18 हजार 40 स्टोअर्स चालविले जातात.