इस्राईलचे पंतप्रधान १५ वर्षानंतर भारत दौऱ्यावर, मोदींनी केली खास तयारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नेतन्याहू यांचा दौरा खास बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खास आयोजन केलं आहे. पीएम मोदी प्रोटोकॉल तोडत नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचं स्वागत करण्यासाठी एयरपोर्टला जाणार आहेत. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 14, 2018, 12:40 PM IST
इस्राईलचे पंतप्रधान १५ वर्षानंतर भारत दौऱ्यावर, मोदींनी केली खास तयारी title=

नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नेतन्याहू यांचा दौरा खास बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खास आयोजन केलं आहे. पीएम मोदी प्रोटोकॉल तोडत नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचं स्वागत करण्यासाठी एयरपोर्टला जाणार आहेत. 

15 वर्षानंतर इस्राईलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत आहेत. तत्कालीन पीएम ऐरल शेरॉन हे 2003 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. पीएम मोदींनी जुलै 2017 मध्ये इस्राईलचा दौरा केला होता. एखाद्या धार्मिक गुरु प्रमाणे मोदींचं इस्राईलमध्ये स्वागत झालं होतं. अधिकाऱ्यांच्या मते मोदीचं ते स्वागत पोप किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताप्रमाणे होतं.

या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, जल संरक्षण, विज्ञान व उद्योग, आंतरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्राईलच्या पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे.

मोदी आणि नेतन्याहू दिल्लीमध्ये तीन मूर्ती स्मारकाला आधी भेट देतील. दोन्ही पंतप्रधान 100 वर्षापूर्वी झालेल्या हाइफा युद्धात लढलेल्या 3 भारतीय रेजिमेंटला आदरांजली वाहणार आहेत. यानंतर तीन मूर्ती चौक आणि तीन मूर्ती मार्गाचं नवं नाव तीन मूर्ती हाइफा मार्ग अधिकृतरित्या केलं जाणार आहे.

भारताच्या तीन राज्यातून इस्राईलला पाठवण्यात आलेल्या सैनिकांच्या नावावर तीन मूर्ती चौक हे नाव ठेवण्यात आलं आहे. मुस्लीम तुर्क यांच्यापासून फिलिस्तीनी लोकांच्या मुक्तीसाठी तिन्ही राज्यांच्या सैनिकांना पाठवण्यात आलं होतं. भारतीय रेजिमेंटने हायफाला जिंकलं. या युद्धात 44 भारतीय जवान शहीद झाले होते.

नेतन्याहू यांच्या पहिली अधिकृत भेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत होणार आहे. रविवारी रात्री पीएम मोदी नेतन्याहू यांच्यासाठी खास पर्सनल डिनर होस्ट करणार आहेत. मोदींच्या इस्राईल दौऱ्यात त्यांचं आवडतं जेवण बनवणाऱ्या भारतीय मूळच्या शेफला बोलवण्यात आलं आहे. 

सोमवारपासून नेतन्याहू यांचा दौरा सुरु होईल. राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचं स्वागत होईल. पीएम मोदींसोबत त्यांची बैठक होणार आहे. डेलिगेशन लेवलची ही मीटिंग होईल त्यानंतर लंच होईल आणि मग व्यापारी सम्मेलन होईल.