Gaganyan Mission: 0.5 सेकंद शिल्लक असतानाच गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द! इस्रोनं सांगितलं खरं कारण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच करणार नाही. हवामान खराब असल्याने हे मिशन सध्या थांबवण्यात आल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 21, 2023, 09:41 AM IST
Gaganyan Mission: 0.5 सेकंद शिल्लक असतानाच गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द! इस्रोनं सांगितलं खरं कारण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द करण्यात आलं आहे. उड्डाणासाठी फक्त 5 सेकंद शिल्लक असताना हे लाँचिंग थांबवण्यात आलं. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यावेळी इंजिनमधील इंधनाने पेट न घेतल्याने गगनयानचं लाँचिंग रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यापूर्वी हवामानामुळे 8 वाजता होणारं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अतंराळ केंद्रातून गगनयानच्या क्रू मॉड्यूलचं लाँचिंग होणार होते. पण हे लाँचिंग आता टळलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

VIDEO | Gaganyaan Test Vehicle - Demonstration (TV-D1) test flight launch put "ON HOLD" at T-5 seconds, ISRO chief says the launch shall be rescheduled very soon. pic.twitter.com/fbZJhLK0GN

इस्रो प्रमुखांनी हे मिशन रद्द करण्यात आल्याची माहिती देताना, नेमकी काय चूक केली याची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे. "टेस्ट व्हेईकल पूर्णपणे सुरक्षित आहे. इंजिन इग्निशन झालं नाही. नेमक्या काय चुका झाल्या याचं विश्लेषण इस्रो करणार असून, त्या दुरुस्त केल्या जातील. काही कारणास्तव स्वचलित लाँचमध्ये बाधा आली, संगणकाने लाँचिंग रोखलं. आम्ही मॅन्यूअल पद्धतीने चुकांचं विश्लेषण करु," असं इस्रो प्रमुख म्हणाले. 

 

याला  टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission -1) म्हटलं जात होतं. तसंच याला टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाइंट (TV-D1) असंही बोललं जात होते. आज जर याचं लाँचिंग झालं असतं तर, टेस्ट व्हेईकल अंतराळवीरासाठी तयार करण्यात आलेल्या क्रू मॉड्यूलला आपल्यासह अवकाशात घेऊन गेलं असतं. हे रॉकेट क्र्यू मॉड्यूलला घेऊन साडे सोळा किमी वर गेल्यानंतर बंगाल खाडीत लँड करणार होतं. 

गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश 2025 मध्ये 3 दिवसांच्या मिशनअंतर्गत माणसांना पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणं आणि नंतर सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं आहे. हे क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणं उतरवलं जाणार आहे. या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असं करणारा चौथा देश ठरणार आहे. 

भारतीय अंतराळवीर म्हणजेच गगनॉट क्रू मॉड्यूलमध्ये बसतील आणि पृथ्वीभोवती 400 किलोमीटर उंचीवर कमी कक्षेत फिरतील. ISRO आपल्या चाचणी वाहन - प्रात्यक्षिक (TV-D1), सिंगल स्टेज लिक्विड प्रोपल्शन रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहे. क्रू मॉड्युलसह हे चाचणी वाहन मिशन संपूर्ण गगनयान कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More