नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमा भारती यांनीही पदाचा राजीनामा दिला.
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षीतपणे धक्कातंत्राचा वापर सुरू केला आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तार हा केवळ विस्तारच नव्हे तर, खांदेपालटासह अनेकांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळेल असे संकेत मोदींनी दिले आहेत.
दरम्यान, भाजप आणि एनडीएतील अनेक अतृप्त चेहऱ्यांना समाधानी करण्यासाठी मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांना नारळ दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
राजीनाम्याची चर्चा असलेल्या मंत्र्यांमध्ये कालराज मिश्र, संजीव बलियान, उमा भारती निर्मला सीतारमन यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान, पक्षाध्यक्ष अमित शाह पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचले असून, पंतप्रधानांच्या ७ लोककल्याण मार्ग येथे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित असल्याचे समजते.