मुंबई : Income Tax Return फाईल करण्याची डेडलाईन(31 जुलै 2022) उंबरठ्यावर आली आहे. Income Tax Department रिटर्न फाईल करण्याठी टॅक्सपेअर्सला एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून रिमाइंडर पाठवत आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही Income Tax Return भरुन घ्या.
हा Income Tax Return मागील आर्थिक वर्षामधल्या (2021-22) तुमच्या Income साठी आहे. मुळात प्रश्न असा येतो की प्रत्येक व्यक्तीला Income Tax Return फाईल करणं महत्वाचं असतं का? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत. ज्या व्यक्तीची ग्रॉस अॅन्यूअल इनकम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना Income Tax Return फाईल करणं गरजेचं असतं. ही ग्रॉस इनकम सहा प्रकारांमध्ये विभागलेली आहे.
त्यामध्ये पगार, रिअल इस्टेट, कॅपिटल गेंस, डिविडेंट, इंटरेस्टची इनकम या घटकांचा समावेश आहे.
ज्या व्यक्तीच्या ग्रॉस इनकम 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे अशांना Income Tax Return फाईल करण्याची गरज नाही. पण हा नियम 60 वर्षांपेक्षा कमी व्यक्तींसाठीच आहे. जर व्यक्ती 60 वर्षांपेक्षा अधिक आणि 80 पेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तींना वार्षिक ग्रॉस इनकम 3 लाखांपेक्षा अधिक असेल तरच Income Tax Return फाईल करावा लागणार आहे. जर व्यक्ती 80 वर्षांपेक्षा अधिक वयाची असेल तर अशा व्यक्तींना वार्षिक ग्रॉस इनकम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच Income Tax Return फाईल करणं गरजेचं आहे.
जर व्यक्तीच्या बॅंक अकाउंटमध्ये एका आर्थिक वर्षामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश डिपॉजिट होत असेल किंवा विड्रॉल होत असेल तर Income Tax Return फाईल करणं गरजेचं आहे. करंट अकाउंटच्या बाबतीत ही रक्कम 50 लाख रुपये इतकी आहे. या कारणांमुळे या बद्दलची माहिती Income Tax Return मध्ये भरणं गरजेचं आहे. जर तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल भरलं असेल किंवा करंट अकाउंटमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम डिपॉजिट केली असेल तर तुम्हाला Income Tax Return फाईल करणं गरजेचं आहे.
जर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुम्हाला दुसऱ्या देशामधून इनकम येतीये तर Income Tax Return भरणं गरजेचं आहे. याचं कारणं म्हणजे या इनकममुळे भारतात टॅक्स लागेल. 75 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या व्यक्तीला Income Tax Return फाईल करणं गरजेचं नाहीये. यासाठी काही नियम आहेत. ते नियम म्हणजे त्या व्यक्तींचा इनकम सोर्स हा केवळ पेंशन असायला हवी. त्याबरोबरच, त्या व्यक्तीची इंटरेस्ट इनकम देखील त्याच बँकेमध्ये असायला हवी ज्यामध्ये पेंशन मिळते. त्यासाठी बँकेमध्ये डिक्लेरेशन द्यावं लागेलं.