नवनिर्वाचित खासदारासोबत सेल्फीचा बहाणा करत 10 जणांचे खिसे कापले

 डॉ. अमर सिंह यांच्यासोबत सेल्फी काढण्याच्या बहाण्याने खिसेकापू नवनिर्वाचित खासदारांच्या जवळ गेले होते. 

Updated: May 31, 2019, 06:24 PM IST
नवनिर्वाचित खासदारासोबत सेल्फीचा बहाणा करत 10 जणांचे खिसे कापले title=

जालंधर : कॉंग्रेस नेते डॉ. अमर सिंह यांनी फतेहगड साहिब जागेतून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांचे मतदार संघात जंगी स्वागत करण्यात आले. पण या स्वागत समारंभात काही खिसे कापूंनी हात साफ करुन घेतले. त्यामुळे डॉ. अमर सिंह यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांना रिकाम्या खिशाने घरी परतावे लागले. डॉ. अमर सिंह यांच्यासोबत सेल्फी काढण्याच्या बहाण्याने खिसेकापू नवनिर्वाचित खासदारांच्या जवळ गेले होते. 

अमलोह रोडवरील सुरजीत बॅंक्वेट हॉलमध्ये बुधवारी ही घटना घडली. इथे वेगवेगळे क्षेत्र तसेच पार्टीतील कार्यकर्ते खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. आमदार रणदीप काका यांच्यासोबत 10 काँग्रेस नेत्यांचे खिसे कापण्याचा प्रकार समोर आला आहे. खिसेकापूंनी आमदारांचे पीए रामकृष्ण भल्ला यांना देखील सोडले नाही. रामकृष्ण यांचेही पाकिट चोरीला करण्यात आले आहे. अमलोहचे डीसीपी गुरुशेर संधू हे या घटनेची चौकशी करत आहेत. ज्या लोकांनी चोरी केली त्यांना ओळखण्यात आल्याचे ते म्हणाले. लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असेही त्यांनी सांगितले.