जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले, चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू - काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे.  

Updated: Jul 2, 2021, 10:22 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले, चकमकीत एक दहशतवादी ठार
Pic / ANI

जम्मू : जम्मू - काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. काल रात्री उशिरा सुरू झालेल्या जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकी अजूनही सुरु आहे. पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा (Rajpora Encounter) येथील हंजन बाला भागात सुरु असलेल्या चकमकीच्यावेळी तीन ते चार दहशतवादी (terrorists) घेरले जाण्याची शक्यता आहे.

चकमकीत 1 दहशतवादी ठार, एक सैनिक शहीद

चकमकीत क्रॉस फायरिंग दरम्यान एक सैनिक शहीद झाल्याची पुष्टी भारतीय लष्कराने दिली आहे. काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चकमकीच्या वेळी जवानाला गोळ्या लागून जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमी सैनिकाचे निधन झाले. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jammu and Kashmir: An encounter is underway between terrorists and security forces in Hanjin Rajpora area of Pulwama

(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/W9VeTbFN2C

— ANI (@ANI) July 2, 2021

तर दुसऱ्या एका घटनेत जंगलाला मोठी आग लागली आहे.राजौरीच्या कुलदब्बी भागात मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागली आहे. आग आटोक्यात आणल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन केले जाईल. ग्रामस्थांसह आमची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. आग एका बाजूने नियंत्रित केली गेली आहे, अशी माहिती सुंदरबणी वनपरिक्षेत्र अधिकारी  राकेश वर्मा यांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली की, पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात हंजिन गावात सुरक्षादलाकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत होते. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर हे ऑपरेशन सुरु होते. त्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. 

लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या लक्षात आले की, सुरक्षा दलाचे जवान आपला मागोवा घेत आहेत. त्यानंतर दहतवाद्यांकडून जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षादलाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले. अद्याप चकमक सुरु आहे. 

भारतीय सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या भागात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यानुसार सुरक्षा दल सतर्क झाले असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, याआधी 27 जून रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एसपीओसहीत त्यांच्या पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.