जम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू

जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती

Updated: Jul 22, 2018, 08:30 AM IST
जम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक जोरदार सुरू होती. जवानांना अखेर दहशतवाद्यांचा खत्मा करण्यात यश आले.  जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती.. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला समजताच जवानांनी शोधकार्यास सुरूवात केले.  दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या चकमकिचा फटका परिसरातील नागरिकांना बसू नये यासाठी संपूर्ण परिसर खाली करण्यात आला होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी काँन्स्टेबल सली यांची कालच (शनिवार,२२ जुलै) हत्या घडवून आणली होती. त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

सुरक्षा दलाला या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. ही कारवाई कुलगामा येथील खुदवानी परिसरातील वानी मोहल्ला येथे पार पडली.. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी एका घरात लपले होते आणि ते सातत्याने सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करत होते.