अनंतनागमध्ये सुरक्षाबलाने दहशतवाद्यांना घेरले

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु 

Updated: Jun 18, 2019, 08:50 AM IST
अनंतनागमध्ये सुरक्षाबलाने दहशतवाद्यांना घेरले  title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त समोर येत आहे. सुरक्षाबलाने घेतलेल्या शोधमोहिमेत दहशतवाद्यांनी फायरिंग केली. या विभागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षाबलांनी त्यांना घेरले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी सेनेच्या ताफ्यावर निशाणा साधत एका वाहनावर आईडी स्फोट केला. यामध्ये नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. दक्षिण काश्मिरच्या या जिल्ह्यामध्ये अरिहाल-लस्सीपोरा मार्गावरील रस्त्यावर दहशतवाद्यांनी ईदगाह अरिहालजवळ 44 राष्ट्रीय रायफल्सच्या अनेक वाहनांच्या ताफ्यांना निशाणा बनवला. या भ्याड हल्ल्यात वाहनांत बसलेले जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

हल्ला होता सेनेच्या जवानांनी विभागाला चारही बाजुंनी घेरले. कोणता दुसरा हल्ला होऊ नये म्हणून हवेत गोळीबार करण्यात आला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींची स्थिती स्थिर आहे. सुरक्षाबलावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे श्रीनगरचे सुरक्षा प्रवक्ता कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. यामध्ये काहींना किरकोळ जखमा झाल्या आणि सर्व जवान सुरक्षित आहेत. ही घटना 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याच्या 27 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.