Jammu Kashmir : CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्यानंतर..... 

Updated: Oct 5, 2020, 02:58 PM IST
Jammu Kashmir : CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद
छाया सौजन्य- एएनआय

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर भागात सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवाया काही कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी (५ ऑक्टोबर) ला काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ११० बटालियनवर बेछूट गोळीबार केला. जम्मू काश्मीर पोलिसांच्या साथीनं ही जवानांची तुकडी पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कंदीझल पूलापाशी रोड ओपनिंग ड्युटीसाठी तैनात होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्य़ा या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर,  तीन जवान जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्यानंतर जखमी जवानांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यानंतर महामार्गावर लगेचच वाहन प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय घटनास्थळ आणि त्यानजीकच्या परिसरात संरक्षण दलांनी शोधमोहिमही सुरु केल्याचं कळत आहे. 

 

(सविस्तर वृत्त लवकरच)