बारामूलात दहशतवादी हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू , सर्च ऑपरेशन सुरू

 सुरक्षा रक्षकांनी या विभागाला घेरून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Updated: Apr 30, 2018, 11:48 PM IST
 बारामूलात दहशतवादी हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू , सर्च ऑपरेशन सुरू

बारामूला : जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा बलाने २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल होत. याच संध्याकाळी दहशतवाद्यांनी बारामूला जिल्ह्यात हल्ला केला. काळोखाचा फायदा घेत ते अंधाधुंद फायरिंग करत आत शिरले. यांच्या गोळीबारातून ३ जणांचे मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकांनी या विभागाला घेरून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. बारामूलाच्या ओल्ड टाउन येथे ही घटना घडली आहे. ३ इसम ओल्ड टाऊनमधील खानपुरच्या दिशेने जात होते. दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर १५ राऊंड गोळ्या चालवल्या. मोहम्मद असगर, आसिफ अहमद शेख आणि हसीब खान अशी मृतकांची ओळख झाली आहे.

दुपारची चकमक 

याआधी दुपारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यावेळी हिजबुल मुजाहिद्दीनच्या समीर अहमद भट (समीर टाइगर) सहित २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. दरम्यान एक नागरिक मृत तर २ जवान जखमी झाले.