Jammu Kashmir Bus Attack : जम्मूतील रियासी भागामध्ये रविवारी भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळं चालकानं नियंत्रण गमावताच बस खोल दरीत कोसळली. हल्ला आणि त्यानंतर झालेला अपघात इतक्या भीषण स्वरुपाता होता, की आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू ओढावल्याचं सांगण्यात येत आहे. काही वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा 10 असल्याची माहितीही प्रसिद्ध केली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार 4 दहशतवादी संघटनांनी या बसवर हल्ला केला असून, त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू हमजा याचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. इंसास रायफलने दहशतवाद्यांनी भाविकांच्या या बसवर हल्ला चढवला होता. नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही दृश्यांच्या माध्यमातून तीन दहशतवाद्यांची छायाचित्रही समोर आली आहेत. या हल्ल्याचं गांभीर्य पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता उच्चस्तरिय बैठक बोलवण्यात आली आहे. ज्यामुळं आता या बैठकीनंतर नेमकी कारवाई कशी असेल याची माहिती समोर येणार आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Visuals from the spot in Reasi where a bus was attacked by terrorists yesterday
9 people lost their lives and 33 were injured in the terror attack.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/1OKRy4QlC1
— ANI (@ANI) June 10, 2024
जम्मूमध्ये भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम आता संरक्षण यंत्रणांनी हाती घेतलं असून, घेतला जातोय. पोलीस, लष्कर आणि CRPFकडून घटनास्थळी आणि या भागाला लागून असणाऱ्या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. भारतीय जवान ड्रोनच्या मदतीनं दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर यापैकी एक दहशतवादी, अबू हमजा हा पाकिस्तानी सैन्यातील माजी सदस्य असल्याचंही सांगण्यात आलं. हमजा आता लष्कर नव्हे, तर दहशतवदी संघटनांसाठी काम करत असल्याची धक्कादायक बाब आतापर्यंतच्या तपासातून समोर आली. सध्या रियासी येथील दहशतवादी हल्ल्यातील तपासासंदर्भाती पुढील कारवाई आणि तपासाची जबाबदारी NIA वर सोपवण्यात आली असून, NIA चे अधिकारी सोमवारी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. या भागात सध्या लष्कराकडूनही शोधमोहिम हाती घेण्यात आली असून, दहशतवाद्यांना कंठस्नानं घालण्यासाठीच यंत्रणा प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे.