पाकिस्तानचे क्रौर्य, भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना

पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचं उघड

Updated: Sep 20, 2018, 10:49 AM IST

नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचं उघड झालंय. जम्मूजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे जवानाला ठार करण्यात आलं. सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला जम्मूनजीक आंतरराष्ट्रीय सीमेवर ठार करून पाकिस्तानी सैन्याने त्याच्या देहाची विटंबना केल्याची संतापजनक घटना घडलीय.

जवान शहीद 

हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार असं या जवानाचं नाव आहे. मंगळवारी भारता पाकिस्तान सीमेवर कुंपणाजवळचं गवत कापताना पाकिस्तानच्या गोळीबारात नरेंद्र कुमार शहीद झाले. गवत कापण्याची कल्पना पाकिस्तानला देण्यात आली होती.

पाकचा गोळीबार 

 तसंच दोन्ही बाजूंनी गोळीबार न करण्याची सहमती झाली होती. तरीही पाकिस्तानने गोळीबार केला. सुरूवातीला नरेंद्र कुमार शहीद झाल्याचे समजले नव्हते. ते बेपत्ता असल्याचं लक्षात आल्याने शोधपथकाची गस्त सुरू होती. त्यात त्यांचा मृतदेह सापडला.