म्हणून अहमदाबादमध्ये जेट एअरवेजचे झाले इमरजन्सी लॅन्डिंग ...

दिल्लीहून मुंबईला जाणार्‍या जेट एअरवेजच्या विमानाचे इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. 

Updated: Oct 30, 2017, 11:21 AM IST
म्हणून अहमदाबादमध्ये जेट एअरवेजचे झाले इमरजन्सी लॅन्डिंग ...  title=

मुंबई : दिल्लीहून मुंबईला जाणार्‍या जेट एअरवेजच्या विमानाचे इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. 

एका धमकीच्या फोनमुळे विमानाचा रूट बदलून त्याचे लॅन्डिग़ करावे लागले आहे. 

9 डब्लयू 339 हे विमान रात्री दोन वाजून ५५ मिनिटांनी मुंबईहून निघाले. मात्र अचानक हे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव हे इमरजंसी लॅन्डिग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबाद विमानतळावर संपूर्ण विमान रिकामे करून त्याची तपासणी करण्यात आली. या विमानामध्ये 115 प्रवासी आणि 7 क्रु मेंबर्स होते. 

अहमदाबादमध्ये जेट एअरवेजचे विमान उतरवून त्यामधील प्रवासांना आणि कर्मचार्‍यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर विमान तपासण्यात आले. मात्र कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती मिळालेली नाही. 

विमानच्या टॉयलेटमध्ये एक नोट मिळाली. त्यामध्ये लिहलेल्या मजकुरात हे विमान हायजॅकर्सच्या ताब्यातआहे. हे विमान दिल्लीमध्ये लॅन्ड न करता थेट POK म्हणजेच पाक व्याप्त काश्मिरमध्ये उतरवा असा संदेश लिहण्यात आला होता.

सुरक्षा यंत्रणांनीदेखील अशा प्रकारची नोट मिळाल्याचे सांगितले आहे.