जम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणात

Jammu Kashmir Elections 2024 Phase 1 voting:  7 जिल्ह्यांच्या 24 विधानसभा जागांवर निवडणुका होतायत. यात एकूण 219 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 3 हजार 276 पोलिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 18, 2024, 09:11 AM IST
जम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणात title=
जम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक,

Jammu Kashmir Elections 2024 Phase 1 voting: जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. घाटीतून कलम 370 हटवल्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काश्मीरची जनता आज ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होतेय. यातील पहिला टप्पा आजपासून सुरु झाला असून यात 7 जिल्ह्यांच्या 24 विधानसभा जागांवर निवडणुका होतायत. यात एकूण 219 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 3 हजार 276 पोलिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत. 

पोलीस आणि सेना जवानांची सुरक्षा 

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत काश्मिरी पंडीतदेखील मतदान करण्यासाठी उतरले आहेत. 35 हजारहून अधिक विस्थापित काश्मीरी पंडिंतांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून व्यक्तिगत रुपात मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या प्रवासी काश्मीरी मतदारांना 24 मतदान केंद्रात ही सुविधा मिळेल. निवडणूक शांततापूर्ण पार पाडावी यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. 

पहिल्या टप्प्यात 4 जागांवर सर्वांची नजर 

बिजबेहरा सीट:

पहिल्या टप्प्यात ज्या 4 जागांवर साऱ्यांची नजर आहे, त्यात बिजबेहराची जागा सर्वात टॉपला आहे. या जागेवर मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ती पहिल्यांदाच निवडणूक लढवतेय. 

कुलगाम सीट:

बिजबेहरानंतर कुलगाम जागेची चर्चा आहे. या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मोहम्मद युसूफ तारिगामी सलग पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. तसेच पीपल्स काँन्फ्रेन्समधून अहमद लावेदेखील रिंगणात आहेत. 

अनंतनाग जागा 

या जागेवर पीरजादा मोहम्मद सईद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जे जम्मू काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष असून कोरनाग जागेवरुन आमदार राहिले आहेत. पीडीपीने अनंतनागहून महबूब बेग यांना उमेदवारी दिलीय. 

पुलवामा सीटी 

या जागेवर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आणि नॅशनल काँन्फ्रेन्समध्ये थेट लढत आहे. पीडीपीने वहीद उर रहमान पारा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.जे पीडीपी यूवाचे मुख्य असून त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप आहे.  यासोबतच नॅशनल काँफ्रेंन्सने मोम्मद खलील बंदला तिकिट दिलंय. जे 2002,2008 आणि 2018 मध्ये पीडीपीच्या तिकिटावर पुलवामात निवडणूक जिंकले आहेत. पण 2018 मध्ये पीडीपी सोडून त्यांनी नॅशनल काँफ्रेन्सध्ये प्रवेश केलाय.