नवी दिल्ली : उत्तर काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने मोहीम सुरु केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे चार दहशतवादी मारले गेले आहेत.
पहिली चकमक ही हंदवाडामधील मागम परिसरात झाली ज्यामध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. चकमक झालेल्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
दुसरी चकमक जुरहामा जंगलात झाली. या ठिकाणी एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर, या चकमकीत एक कमांडो शहीद झाला असून इतर तीन जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी मागम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली होती. त्यानंतर सैन्यदल आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रित मिळून सर्च ऑपरेशन सुरु केलं.
#Visuals from J&K: One army jawan lost his life and three injured in Kupwara encounter, operation underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/xlIMKC258P
— ANI (@ANI) November 21, 2017
हे सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.