JN.1 Variant: 'या' व्यक्तींना JN.1 चा धोका अधिक; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

JN.1 Variant: सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येतायत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.

सुरभि जगदीश | Updated: Dec 22, 2023, 09:25 AM IST
JN.1 Variant: 'या' व्यक्तींना JN.1 चा धोका अधिक; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचा तज्ज्ञांचा सल्ला title=

JN.1 Variant: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण सापडत असून काही ठिकाणी या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुमारे 7 महिन्यांपूर्वी कोरोना संदर्भात 'सार्वजनिक आरोग्य आपात्कालीन' अधिसूचना मागे घेतली होती. यानंतर कोरोना जवळपास संपुष्टात आल्याचं दिसत येत होतं. पण आता 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. 

सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येतायत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ते नवीन लाट येणार आहे हे म्हणण्यापूर्वी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. याला घाबरण्याची गरज नाही. 

कोरोनाचे अजून सब-व्हेरिएंट्स समोर येण्याची शक्यता आहे. भारतात पुन्हा एकदा कोविड 19 चे रुग्ण वाढू लागले आहेत. याच्या मागे जबाबदार JN.1 "पिरोला"चा प्रकार हे BA 2.86 चा वंशज असून ते एक Omicron subvariant आहे. जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 ला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकृत केलंय.

JN.1 कोणामध्ये वेगाने पसरू शकतो?

IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोविड टास्क फोर्सचे डॉ. राजीव जयदेवन यांनी गुरुवारी सांगितलं की, नवीन स्ट्रेन वृद्ध लोकांसाठी आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्यांना व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो. 

डॉ. जयदेवन यांच्या म्हणण्यानुसार, "JN.1 हा वेगाने पसरणारा प्रकार आहे. हा सब-व्हेरिएंट त्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो जे वृद्ध आणि आजारी आहेत. या व्हेरिएंटमुळे अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता असते. काही प्रकरणामध्ये गुंतागुंतही वाढू शकते. नोव्हेंबरपासून कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बहुतांश लोकं कोविडला साधी सर्दी समजू लागतात. मात्र हा प्रकार वेगळा आहे. कोरोना आपल्या शरीरातील रक्त-वाहिन्यांना प्रभावित करू शकतो. हे सतत होत असल्याने वारंवार सर्दी होण्याचं प्रमाण देखील वाढू शकतं, असंही डॉ. जयदेव यांनी सांगितलं आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लग्न, ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणं चांगला पर्याय असू शकतो. मास्क वापरल्याने कोविडसह इतर श्वसनासंदर्भातील समस्याही होण्याचा धोका कमी होतो.