विद्यार्थीनीची प्राध्यापकाकडून छेडछाड, 'जेएनयू' विद्यार्थ्यांंचं आंदोलन

दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. 

Updated: Mar 17, 2018, 10:40 AM IST
विद्यार्थीनीची प्राध्यापकाकडून छेडछाड, 'जेएनयू' विद्यार्थ्यांंचं आंदोलन title=

दिल्ली : दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. 

दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी मध्यरात्री जेएनयू ते वसंत कुंज पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. 

'प्राध्यापकांना अटक करा'

विद्यापीठातील प्राध्यापक अतुल जौहरी यांच्यावर छेडछाडीचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले होते. जौहरी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

त्यांच्या अटकेची मागणी करत विद्यार्थ्यांनी ही निदर्शने केली. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वसंत कुंज पोलिस ठाण्यासमोरील नेल्सन मंडेला रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. दिल्ली पोलीस जौहरी यांच्याविरोधात कारवाईसाठी पाऊल उचलत नसल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केलाय.