आसाराम बापूच्या भविष्याचा आज फैसला; जोधपूर कोर्ट सुनावणार शिक्षा

आसाराम विरोधात गुजरातमध्ये बलात्काराचा खटला सुरू असल्यानं त्याची सुटका होणार नसल्याची चर्चा आहे.

Updated: Apr 25, 2018, 06:23 AM IST
आसाराम बापूच्या भविष्याचा आज फैसला; जोधपूर कोर्ट सुनावणार शिक्षा title=

जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या शिक्षेवर आज (बुधवार) जोधपूर कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी हिंसाचार भडकू नये यासाठी जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

जोधपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. रामरहिम खटल्याच्यावेळी हिंसा भडकली होती. तसा प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलाय. या सुनावणीवेळी आसाराम बापूच्या भक्तांनी उपस्थित राहू नये असं आवाहन करण्यात आलंय. या प्रकरणी आसाराम बापूची निर्दोष मुक्तता झाली तरी त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. 

आसाराम विरोधात गुजरातमध्ये बलात्काराचा खटला सुरू असल्यानं त्याची सुटका होणार नसल्याची चर्चा आहे.