लखनऊ : आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे दोन क्षण कुटुंबासोबत घालवावेत असं कोणाला वाटत नसेल. पण या आनंदाचा असा काही विचित्र शेवट होईल असं कोणाच्या मनातही नसेल. त्याने घरी केक आणला. पत्नी आणि मुलीसोबत केक कापला. निमित्त काय होतं ते फक्त त्यालाच माहिती असावं कदाचित. त्याने आपल्या पत्नी-मुलांसोबत स्वत:ला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर जे घडलं ते दुर्दैवी होतं.
लखनऊचे ज्यूनियर इंजिनियर शैलेंद्र कुमार केक घेऊन घरी आले होते. शैलेंद्रने केक कापण्यापुर्वी कुटूंबियातल्या सर्वांना पुढील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर केक कापला आणि सर्वांनी मिळून खाल्ला. हा केक खाल्यानंतर तिघांचा मृत्यू झाला. या केकमध्ये विष मिसळून पतीचा स्वत:सह संपुर्ण कुटूंब संपवण्याचा इरादा होता.
लखनऊच्या जानकीपुरम एक्स्टेंशन भागात ही घटना घडली.
शेजाऱ्यांची मदतीसाठी धाव
शेजारी लव कुश यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष प्राशन केल्याचे समजताच आम्ही दरवाजा उडी मारून आत गेलो आणि पाहिले की,घराच्या गॅलरीत सर्वजण वेदनेने जमिनीवर पडले होते, आम्ही त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यास नकार दिला, हे ऐकून आम्हा सर्वांना धक्काच बसला.
शेवटचा कॉल
मयत शैलेंद्र याने त्यांच्या कार्यालयातून कोणाला तरी फोन करून सांगितले होते की, आता आम्ही जगू शकणार नाही, आम्ही केक कापून वाढदिवस साजरा करणार आहोत. कार्यालयातील व्यक्तीला या गोष्टीत काहीतरी गोडबंगाल असल्याचे कळताच त्याने पोलिसांना माहिती दिली. मात्र तिथपर्यंत उशीर झाला होता.
विष प्राशन करूनही तिघांना गाडी न मिळाल्याने शेजारी राहणाऱ्या सीमाने तिघांनाही आपल्या कारमध्ये बसवले, मात्र कुटूंब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नको, अशी ओरड करतच ती गाडीत बसली. यानंतर सीमाने घाबरून गाडी सोडली, मात्र त्यानंतर पोलिस हवालदाराने गाडी चालवून रुग्णालयात नेले. मात्र खुप उशीर झाल्याने तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान या कुटूंबाने सुसाईड करण्याचा का निर्णय़ घेतला याचे कारण समोर आले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.