सेवाज्येष्ठतेचा वाद: आज न्यायाधीश के. एम. जोसेफ यांचा शपथविधी

वाद निर्माण होण्याची शक्यता

Updated: Aug 7, 2018, 10:58 AM IST
सेवाज्येष्ठतेचा वाद: आज न्यायाधीश के. एम. जोसेफ यांचा शपथविधी title=

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात ज्यांच्या नियुक्तीवरून वाद होते. त्या न्यायाधीश के. एम. जोसेफ यांचा आज शपथविधी होतो आहे. जोसेफ यांच्यासोबतच न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि न्यायाधीश विनित सरन हे देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. शपथग्रहण समारंभाच्या यादीत न्यायाधीश जोसेफ यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळं त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जोसेफ यांच्या सेवाज्येष्ठतेचा मुद्दा सरकारपुढं मांडणार असल्याचं आश्वासन सरन्यायाधीश दीपक मिश्रांनी दिलं आहे. आज शपथविधी होत असलेल्या तीन न्यायाधीशांमध्ये जोसेफ हे सर्वात अगोदर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. त्यामुळं आजच्या यादीतही त्यांचं नाव पहिलं असावं, असा युक्तीवाद केला जातोय. तर जोसेफ हे अगोदर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले असले, तरी सेवाज्येष्ठतेनुसार ते इतर दोघांपेक्षा कनिष्ठ असल्याचा सरकारचा दावा आहे.