दिल्ली : कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो सात दिवसांसाठी भारताच्या दौर्यावर आले आहेत. या दौर्यात जस्टिन यांनी सहपरिवार भारताच्या विविध शहरांना भेट दिली आहे. आज नरेंद्र मोदींची देखील त्यांनी सहपरिवार भेट घेतली.
भारतामध्ये क्रिकेटचं वेड गल्लीगल्लीमध्ये जाणवतं. मग जस्टिनलादेखील हातात क्रिकेटची बॅट घेण्याचा मोह आवरता आला नाही. कपिल देव आणि अझरूद्दीन यांच्यासोबत ट्रुडो परिवार क्रिकेटच्या मैदानावर उतरले. जस्टिन यांनी दोनदा बॅट फिरवत हातात पकडली.
जस्टिन नंतर त्यांच्या दोन्ही मुलांनीदेखील हातात क्रिकेट बॅट धरली होती. यावेळेस कपिल देव आणि अझरुद्दीन यांनी त्यांना क्रिकेटच्या मैदानावर काही खास टीप्स दिल्या.
#WATCH: Canadian Prime Minister #JustinTrudeau along with his children at a cricket ground in #Delhi. Former Indian captains Kapil Dev & Mohd Azharuddin also present. pic.twitter.com/qJmKhtrNMX
— ANI (@ANI) February 22, 2018
जस्टिन ट्रुडो यांचा लहान मुलगा हेड्री ट्रुडो याचे विमानतळावर आगमन झाल्यापासूनच मीडियाच्या कॅमेर्यांनी लक्ष वेधून आहे. अमृतसरच्या सुवर्णमंदिराला भेट दिल्यानंतर ट्रुडो परिवार जामा मशिदीला भेट द्यायला गेला होता. दरम्यान भारतात वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे काही वेळेस कंटाळलेल्या हेड्रीचे फोटोही काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आज हेड्री क्रिकेटच्या मैदनावर रमताना दिसला.