Breaking | वाचाळ वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक; महात्मा गांधीबद्दल केले आक्षेपार्ह वक्तव्य

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कराणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे.

Updated: Dec 30, 2021, 09:03 AM IST
Breaking | वाचाळ वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक; महात्मा गांधीबद्दल केले आक्षेपार्ह वक्तव्य title=

रायपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कराणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे.

रायपूर पोलिसांनी खजुराहोच्या एका हॉटेलमधून कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. दुपारपर्यंत त्यांना रायपूर येथे नेण्यात येईल. कालीचरणविरूद्ध टिकरापारा पोलीस स्टेशनमध्ये एफआय़आर दाखल आहे.

महाराष्ट्र विधानसभेत पडसाद

राज्याच्या विधानसभेत कालीचरण महाराजच्या वक्तव्याविरोधात मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला होता. कालीचरण महाराजांना फर्जी बाबा म्हणत नवाब मलिक म्हणाले होते की, फर्जी बाबाचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना दिसत आहेत.

काँग्रेस आणि भाजपने या वक्तव्याचा केला निषेध

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. विजय वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा गांधी हे महापुरुष आहेत. 56 देशांमध्ये त्यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात अशी भाषा वापरणे निषेधार्ह आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही कालीचरण महाराज यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.