नवी दिल्ली : कन्हैया कुमार, उमर खलिद यांच्या अडचणीत येणाऱ्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य तसेच इतर काही जणांविरूद्ध देशद्रोहा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. संसद हल्ल्ल्लयातील दोषी आरोपी अफजल गुरूला फाशीवर लटकावण्याविरोधात झालेल्या कथित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना ताब्यात घेण्यात आले होते.
2016 मध्ये देशद्रोहाच्या प्रकरणात यांना अटक करण्यात आली होती. यांच्या अटकेनंतर खूप मोठा वाद झाला होता. पोलीस यंत्रणा भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आहे. पोलीसांना जबाब घेण्यासाठी इतर राज्यांचा दौरा करावा लागला होता. याप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल होईल असे सांगण्यात येत आहे. जेएनयूच्या वादग्रस्त कार्यक्रमात लोकांमध्ये नाराजी आहे. या कार्यक्रमात देशविरोधी नारे लागल्याचा आरोप करण्यात येत आहे.