मुंबई : कानपूरच्या गोळीकांडाचा आरोपी आणि गँगस्टर विकास दुबेच्या पत्नीला ऋचा दुबेला पोलिसांनी लखनऊमधील कृष्णानगर परिसरातून अटक केलं आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. ऋचा दुबेला घेऊन पोलीस कानपूर येथे पोहोचले आहे. आता त्यांची चौकशी सुरू आहे.
या दरम्यानच उत्तर प्रदेश एसटीएफने गँगस्टर विकास दुबेला अटक केली आहे. पोलीस विकास दुबेला घेऊन कानपूरला घेऊन आले. विकास दुबेला मध्य प्रदेशच्या पोलिसांनी अटक केली नाही यामुळे ट्रांजिट रिमांडची गरज भासली नाही.
कानपुर पोलिसांनी सांगितलं की, विकास दुबेच्या पत्नीला ऋचा दुबेला देखील अटक केली आहे. या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी दुबेच्या पत्नीला अटक केली आहे. त्याचं मुलं लहान असल्यामुळे आईसोबतच त्याला सुरक्षित ठेवण्यात आलं आहे.
#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, "Main Vikas Dubey hoon, Kanpur wala." #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020
८ पोलिसांच्या हत्याकांडातील मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबे याला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विकास दुबे याने महाकालेश्वर मंदिरात पावती फाडली आणि त्यानंतर आत्मसमर्पण केले. सध्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विकास दुबे यांच्या अटकेची माहिती यूपी पोलिसांनी दिली आहे.
विकास दुबेने आत्मसमर्पण केल्याची स्थानिक माध्यमांना माहिती दिली होती. यानंतर उज्जैनच्या महाकाळ पोलीस ठाण्याजवळ त्यांनी स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी विकास दुबे याला अटक केली असून त्याला महाकाल पोलीस ठाण्यात आणले आहे. आत्मसमर्पण केल्याच्या बातमीनंतर एसटीएफची टीम उज्जैनला रवाना झाली आहे.