कर्नाटक विधानसभा निवडणूक: भाजपने ८२ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

१२ मे रोजी कर्नाटकातील सर्व जागांवर निवडणुका होत आहे तर, १५ मे या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या दिवशी कर्नाटकच्या जनतेच्या मनात काय आहे याचा उलघडा होणार आहे.

Updated: Apr 16, 2018, 06:06 PM IST
कर्नाटक विधानसभा निवडणूक: भाजपने ८२ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. काँग्रेसपाठोपाठ भाजपने आपल्याही उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीत ८२ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजप मुख्यालयात ही यादी जाहीर करण्यात आली. 

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस एडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण, केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

पहिल्या यादित ७२ उमेदवार

भाजपचे केंद्रीय निवड समिचेचे सचिव जे पी नड्डा यांनी सोमवारी दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली. दरम्यान, यापुर्वी पक्षाने ७२ उमेदवारांची पहिली यादी आठ एप्रिलला जाहीर केली होती. ज्यात पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी एस डेडियुरप्पा, यांच्या नावाचाही समावेश होता.  

 

१२ मे ला मतदान १५ मे ला निकाल

दरम्यान, १२ मे रोजी कर्नाटकातील सर्व जागांवर निवडणुका होत आहे तर, १५ मे या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या दिवशी कर्नाटकच्या जनतेच्या मनात काय आहे याचा उलघडा होणार आहे.