बंगळुरु : कर्नाटकातला सत्तासंघर्ष अधिक तीव्र झालाय. काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत ११७ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली.
जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिलं नाही.
मात्र, घटनेला धरून निर्णय घेण्यात येईल असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय. तर, सत्तास्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते काँग्रेस जेडीएस करणार असल्याचं सांगत न्यायलयात धाव घेण्याचे संकेत काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी दिले आहेत. त्यामुळे जेडीएस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली.