कर्नाटक सरकारने केली शेतकऱ्यांना कर्जमाफी

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ आता कर्नाटक सरकारनंही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलीय.

PTI | Updated: Jun 21, 2017, 08:14 PM IST
 title=

बंगळुरु : उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ आता कर्नाटक सरकारनंही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलीय.

शेतकऱ्यांचे ५० हजारांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. मात्र केवळ सहकारी बँकांमधून घेतलेलं कर्ज माफ करण्यात येणार आहे. 

कर्नाटकातल्या पीककर्ज घेणा-या २२ लाख २७ हजार शेतक-यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या कर्जमाफीमुळं कर्नाटक सरकारवर ८ हजार १६५ कोटींचा बोजा पडणार आहे.