बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेतली आहे. तर, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला आमंत्रण दिलं आहे. भाजपने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितला आहे. सुत्रांच्या मते, येडियुरप्पा १७ मे रोजी म्हणजेच गुरुवारी शपथ ग्रहण करतील. तर, जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांनीही काँग्रेसच्या समर्थनासह सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. मात्र, राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. (अपडेट 6.38) (लाईव्ह अपडेटसाठी क्लिक करा http://zeenews.india.com/marathi/live)
कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. जेडीएसनंही काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला आहे. पण या रणनितीनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री नकोत म्हणून काँग्रेसच्या लिंगायत समाजाच्या आमदारांनी बंड केलं आहे. कुमारस्वामी हे वोकलिग्गा समाजाचे नेते आहेत. कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. तरी ११२ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही. भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं देवेगौडांच्या जेडीएसला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचं नाव पुढे आलं पण काँग्रेसच्याच काही आमदारांनी याला विरोध केला आहे. अपडेट- 5.40
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांसोबत बोलताना येडियुरप्पांनी सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितला असल्याचं म्हटलं. (अपडेट 5.29)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर सत्तास्थापनेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आहे तर, येडियुरप्पा राज्यपालांना भेटणार असून त्यांच्यासोबत अनंतकुमारही उपस्थित असणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर, भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं समोर आलं आहे. येडियुरप्पा राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच एक प्रस्तावही सादर केला आहे. काँग्रेसच्या प्रस्तावानुसार, जेडीएसला मुख्यमंत्रीपद आणि ११ मंत्रीपद तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि २१ मंत्रीपद मिळायला हवेत. जर काँग्रेसने दिलेला प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला तर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होईल.
काँग्रेसने दिलेला प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला आहे. काँग्रेसने जेडीएसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी आम्ही काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं जेडीएसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. तर कुमारस्वामी हे सायंकाळी काँग्रेस नेत्यांना भेटणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. काँग्रेसला एकूण ७८ जागांवर आघाडी आहे. तर जेडीएसकडे ३८ जागा आहेत. तर भाजपकडे १०४ जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी कर्नाटकात ११२ जागांची गरज आहे. भाजपा बहुमताच्या अगदी जवळ आहे हे नक्की, पण अपक्ष देखील फक्त २ निवडून आले आहेत. (अपडेट दुपारी 4.00)
कर्नाटक निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमताचा आकडा अजूनही त्यांना गाठता आलेला नाही. त्यातच आता काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग अवघड झाला आहे. तर जेडीएसनेही काँग्रेसची ऑफर स्वीकारली आहे. जेडीएस 38 जागांवर आघाडी आहे, तर काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे जेडीएसला बहुमत मिळत आहे. त्यामुळे दोघे मिळून आजच सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहे. आता राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्व विरोधी पक्ष भाजप विरोधात एकत्र आलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देवेगौडांशी चर्चा करुन काँग्रेस सोबत जाण्याचा सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देवेगौडांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली आहे. (अपडेट दुपारी 3.18)
कर्नाटक निवडणुकीचे निकाल जसेजसे पुढे येत आहे तसे-तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता भाजपमध्येही हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेते जे.पी नड्डा आणि प्रकाश जावडेकर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांच्या भेटीला गेले आहेत. यानंतर ते कर्नाटकला रवाना होतील असं देखील बोललं जातंय.(अपडेट दुपारी 3.30)
कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोदीविरोधक एकवटताना दिसत आहेत. कर्नाटकातील बहुमताचा आकडा ११२ च्या खाली आल्यानंतर, राजकीय चित्र बदलत आहे. जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी म्हणून, बंगालमधून ममता बॅनर्जी, आंध्रमधून चंद्राबाबू नायडू यांनी जेडीएसचे एचडी दैवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. एकंदरीत जोपर्यंत भाजप कर्नाटकात सत्तेच्या जवळ होता, तोपर्यंत विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा भाजप बहुमतापासून ६ जागांनी दूर गेला, तेव्हा विरोधक एकवटत आहेत. एकंदरीत तासाला परिस्थिती कर्नाटकाच्या राजकारणात बदलत आहे. (अपडेट दुपारी 2.51)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सुरूवातीला ११३ जागांनी आघाडीवर होती. पण अचानक बहुमताचा आकडा ११२ च्या खाली भाजपाची संख्या गेली, तो त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणखी ६ आमदारांची कमतरता भासत आहे. यात ३ अपक्ष निवडून आले आहेत, तर जेडीएस आणि काँग्रेस यांचा आकडा मिळून बहुमताचा आकडा पार होवू शकतो, यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, सोनिया गांधी यांनी जेडीएसचे एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवरून चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस ७३ ठिकाणी आघाडीवर आहे, तर जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवर असलेल्या एकूण जागांची आकडेवारी ही ११४ होत आहे. काँग्रेस जेडीएसला सत्ता स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ शकते असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकाचा कल शेवटच्या टप्प्यात बदलल्याने राजकीय समीकरणं देखील बदलत आहेत, पण एवढ्यावर शांत बसतील ते भाजपाचे अध्यक्ष अमित शहा कसे, म्हणून अमित शहा देखील यावर पुढची कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (अपडेट दुपारी 2.28)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दुपारी घेतलेली भाजपाची आघाडी ६ आकड्याने कमी झाल्याने, नवीन पेच निर्माण झाला आहे. भाजपाचा आकडा दुपारी ११२ पर्यंत आला होता. तसेच भाजपाला स्पष्ट बहुमतासाठी ११२ ही मॅजिक फिगर हवी आहे. मात्र अनेक ठिकाणी मतमोजणी अजूनही स्पष्ट होवू न शकल्याने, काही निकाल उशीरा स्पष्ट होत आहेत, यात भाजपाचा आकडा ६ जागांनी खाली आल्याने, भाजपासमोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस ७३ ठिकाणी आघाडीवर आहे, तर जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवर असलेल्या एकूण जागांची आकडेवारी ही ११४ होत आहे. एकंदरीत कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती तयार होत आहे. (अपडेट 02.04 दुपारी)
काँग्रेसचे कर्नाटकाचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांचा चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघात पराभव झाला आहे. सिद्धरामैय्या चामुंडेश्वरी आणि बदामी या २ मतदार संघातून निवडणूक लढवत होते, त्यापैकी चांमुंडेश्वरीत सिद्धरामैय्या यांचा पराभव झाला आहे. तर बादामीत देखील सिद्धरामैय्या पराभवाच्या छायेत आहेत. बादामी मतदार संघात सिद्धरामैय्या यांच्या जिंकण्याच्या अपेक्षाही दुसरीकडे व्यक्त केल्या जात आहेत. ( लाईव्ह अपडेटसाठी क्लिक करा http://zeenews.india.com/marathi/live ) जर कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले असते, तर सिद्धरामैय्या हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र त्यांचाच एक नाही तर दोन विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्याने, कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवापेक्षा ही बाब मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे, त्यामुळे भाजपाला कर्नाटकात स्वबळावर सरकार स्थापन करता येणार आहे. (अपडेट 11.41 दुपारी)
कर्नाटकात भाजपाला सुरूवातीला मिळालेल्या आघाडीत, निर्विवाद बहुमत मिळालं आहे. भाजपाचा कर्नाटकात हा दमदार विजय मानला जात आहे. भाजपाने बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे. भाजपा ११३, काँग्रेस ६२, जेडीएस ४४ तर ०२ अपक्ष निवडून आले आहेत. काँग्रेसनं कर्नाटकातील सत्ता गमावली आहे, तर कर्नाटकाचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामैय्या दोन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत होते, सिद्धरामैय्या हे दोन्ही ठिकाणी पिछाडीवर आहेत. (अपडेट लाईव्ह पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live ) बंगळुरूत भाजपा कार्यालयासमोर जल्लोष सुरू आहे. भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापनेचा भाजपाचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर हा त्यांच्या नेतृत्वातला पहिला पराभव मानला जात आहे. यामुळे दक्षिण भारतात भाजपाने मोठी मुसंडी मारली असल्याचं म्हटलं जात आहे. (अपडेट 10.43)
भाजपने शंभराचा आकडा ओलांडला आहे. भाजपा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. भाजपाचे उमेदवार १०२ जागांवर तर काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस ४२ जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत भाजपच्या पारड्यात सर्वात मोठा आकडा कन्नडी जनतेने टाकला आहे. यावर भाजपची पुढील रणनीती पक्षाचे अध्यक्ष अमित शाह काय ठरवतीय यावर अवलंबून आहे, पण भाजपाचा आतापर्यंतचा सत्ता स्थापनेचा इतिहास बघितला तर भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा असतील तर सत्ता स्थापन करण्यात मोठी अडचण येणार नसल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकात अजूनही ११ जागांचा कल राहिलेला आहे. (अपडेट 9.45 सकाळी)
कर्नाटकातून सीमावासीयांसाठी सर्वात वाईट बातमी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. यामुळे सीमावासीयांसाठी आणि चळवळीसाठी ही फार चांगली बातमी नाहीय. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव आणि इतर मतदार संघात चार उमेदवार दिले होते, हे चारही उमेदवार पिछाडीवर होते. या उमेदवारांना शिवसेनेने देखील पाठिंबा दिला होता, बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपक्ष मराठी उमेदवार उभे करण्यात आले होते. एकीकरणाच्या चळवळीला हा फटका मानला जात आहे. (अपडेट ९.३०)
काँग्रेससाठी कर्नाटकातून दिलासादायक बातमी आहे, कारण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सिद्धरामैय्या हे बदामी विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर होते, आता ते आघाडीवर आले आहेत, तर कर्नाटकात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळत नसलं तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये २ ते ३ जागांचा फरक असण्याची शक्यता वाढली आहे, यामुळे कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती आहे. भाजप हा कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर भाजपला सत्ता स्थापन करण्याची मोठी संधी आहे. मात्र जेडीएसचा देखील भाव वाढणार आहे हे निश्चित, कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपात निकराची लढाई सुरू आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा आघाडीवर आहे. (अपडेट 9.11)
कर्नाटकातून भाजपसाठी दिलासादायक बातमी आहे. भाजपाला बहुमतासाठी २१ जागांची गरज आहे. भाजपने जागांची नव्वदी पार केली आहे. त्रिशंकू स्थिती आणि जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत असेल किंवा नाही हे मात्र शेवटच्या निकालात समजणार आहे. पण सध्या भाजपा सरकार स्थापन करण्यासाठीच्या अनुकूल स्थितीकडे जात आहे. भाजपाला बहुमतासाठी केवळ २० जागांची गरज आहे (अपडेट 8.54 सकाळी) मात्र आणखी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होवू शकते अशी देखील दुसरी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये फारसं अंतर राहिलं नाही, तर कर्नाटकाची परिस्थिती आणखी अस्थिर होईल, मात्र सध्या भाजपाकडे इतरांपेक्षा मोठा आकडा आहे.
सध्याच्या स्थितीवरून जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत येणार असल्याचं दिसत आहे. कारण निम्म्यापेक्षा जास्त जागांचे कल हाती आल्यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. ८.४३ वाजेच्या अपडेट नुसार भाजप ८८ तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर होतं, तर जेडीएस २६ जागांवर आघाडीवर आहे, म्हणून जेडीएस किंग मेंकरच्या भूमिकेत जाणार असल्याचं सध्या सुरू असलेल्या कलवर दिसून येत आहे. सध्याचा निकाल हा त्रिशंकू स्थिती तयार करणारा आहे.
कर्नाटकातील सध्याची राजकीय पक्षांची आघाडी ही त्रिशंकूकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भाजपकड़े ५८ तर काँग्रेसकडे ६० जागांची आघाडी आहे, तर जेडीएसकडे १६ जागा आहेत, म्हणून सुरूवातीचे कल पाहिले तर ही स्थिती त्रिशंकूकडे जात आहे. सिद्धरामैय्या बदामीत पुढे गेले आहेत. ते काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याने चिंता व्यक्त केली जात होती, मात्र हा काँग्रेससाठी हा दिलासा आहे. कर्नाटक विधानसभेच्या निम्मे जागांचा कल हाती आल्यानंतर परिस्थिती त्रिशंकू दिसत आहे.(update 8.30)
भाजपने कर्नाटकात आघाडी घेतली आहे, सुरूवातीला आघाडीवर असलेल्या काँग्रेसला भाजपने पुन्हा मागे टाकलं आहे, काँग्रेस 50 तर भाजप 53 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि काँग्रेसने फिफ्टी फिफ्टी जागा मिळवल्या आहेत. येडियुरप्पा आघाडीवर आहेत, सिद्धरामैय्या दोन ठिकाणी पिछाडीवर आहेत. मात्र त्यांचा मुलगा एक ठिकाणी आघाडीवर आहे. दोन्ही रेड्डी बंधू आघाडीवर आहेत. (update 8.15)
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेचा निकाल आपण सर्वात आधी 24taas.com वर पाहा. कर्नाटक निकाल ट्वीटर आणि फेसबुकवर पाहण्यासाठी #कानडीकौल हा हॅशटॅगने सर्च केल्यास तुम्हाला निकालाचे सर्व अपडेट पाहता येतील. http://zeenews.india.com/marathi/live कर्नाटक निवडणुकीचं महाकव्हरेज झी २४ तासने केलं आहे. काँग्रेस सत्ता राखणार का? केंद्रातील सत्ताधारी भाजपचा विजयाचा अश्वमेध कर्नाटकातही धावणार का? जेडीएस किंगमेकर ठरणार की बाजूला फेकला जाणार, हे सर्व चित्र काही तासांत स्पष्ट होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी आज मतदान होणार आहे. कर्नाटकाचा कौल कुणाला याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ही निवडणूक जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्वाची आहे, तेवढीच काँगेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी देखील महत्वाची आहे. हे सर्व निकाल तुम्ही सर्वात आधी झी २४ तासवर पाहू शकता.
#कानडीकौल : सिद्धरामैय्या यांचा मुलगा आघाडीवर karnatakaresult2018 http://zeenews.india.com/marathi/live
#कानडीकौल : मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, बदामी आणि चांमुडेश्वरीमध्ये सिद्धरामैय्या पिछाडीवर #karnatakaresult2018 http://zeenews.india.com/marathi/live
#कानडीकौल : मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सिद्धरामैय्या पिछाडीवर #karnatakaresult2018 http://zeenews.india.com/marathi/live
#कानडीकौल : भाजप ६ , काँग्रेस १५ , जेडीएस ३ , इतर 00 #karnatakaresult2018 http://zeenews.india.com/marathi/live
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेचा निकाल आपण सर्वात आधी 24taas.com वर पाहा. कर्नाटक निकाल ट्वीटर आणि फेसबुकवर पाहण्यासाठी #कानडीकौल हा हॅशटॅगने सर्च केल्यास तुम्हाला निकालाचे सर्व अपडेट पाहता येतील. तुम्ही तुमच्या निकालाचं अपडेट तुमच्या मोबाईलवरही लाईव्ह पाहू शकता. यासाठी झी २४ तासच्या या लाईव्ह लिंकवर http://zeenews.india.com/marathi/live क्लिक केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहेत. कर्नाटक निवडणुकीचं महाकव्हरेज झी २४ तासने केलं आहे. काँग्रेस सत्ता राखणार का? केंद्रातील सत्ताधारी भाजपचा विजयाचा अश्वमेध कर्नाटकातही धावणार का? जेडीएस किंगमेकर ठरणार की बाजूला फेकला जाणार, हे सर्व चित्र काही तासांत स्पष्ट होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी आज मतदान होणार आहे.
कर्नाटकाचा कौल कुणाला याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ही निवडणूक जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्वाची आहे, तेवढीच काँगेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी देखील महत्वाची आहे. हे सर्व निकाल तुम्ही सर्वात आधी झी २४ तासवर पाहू शकता.