बोल्ड अँड ब्युटीफुल कियारा अडवाणी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी लावते इतकी स्वस्त वस्तू ..पहा काय आहे ती...

कियारासारखी सुंदर स्किन मिळवणं आता सोपं आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागणार नाहीये

Updated: Jul 31, 2022, 01:34 PM IST
बोल्ड अँड ब्युटीफुल कियारा अडवाणी चेहऱ्यावर  ग्लो येण्यासाठी लावते इतकी स्वस्त वस्तू ..पहा काय आहे ती...  title=

 HEALTH AND FASHION: बी टाऊन ची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेञी किनारा अडवाणी तिच्या सुंदर दिसण्यासोबत लक्झरी फॅशनसाठी सुद्धा ओळखली जाते. सर्वानाच माहित आहे कियारा अडवाणी श्रीमंत घरातून आलेय बोल्डनेस आणि सुंदरतेसोबत ती तिच्या फॅशन साठी ओळखली जाते .खुप कमी कालावधीत कियाराने इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमावलं आहे 
तिची स्माईल असो डान्स असो तिच्या प्रत्येक अदांवर तिचे फॅन्स फिदा आहेत ,कियारासारखी सुंदर हेल्थी स्किन मिळावी असा प्रत्येक मुलीचं स्वप्न  असेल यात तर काहीच शंका नाही. 
पण कियारासारखी अभिनेत्री जी गर्भश्रीमंत घरात लहानाची मोठी झाली ,आज करोडोंमध्ये फीस आकारते ती तिच्या स्किनसाठी अर्थातच महागडे प्रॉडक्ट्स वापरत असेल असं आपल्याला वाटत असेल. 

कियारासारखी सुंदर स्किन मिळवणं आता सोपं आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागणार नाहीये ..एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे कियाराच्या सुंदरतेचं सिक्रेट आपल्याच किचन मध्ये आहे. तुम्ही फ्रीझ उघडला कि हे सिक्रेट तुमच्या समोर दिसेल जे वापरून तुम्ही सुंदर नितळ आणि ग्लोइंग स्किन मिळवू  शकता 

कियारा सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी खूप महागडे ट्रीटमेंट्स किंवा प्रॉडक्ट्स वापरत नाहीत तर ती वापरते एक अशी गोष्ट जी आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असते ..आणि ती गोष्ट म्हणजे टोमॅटो ..हो केवळ टोमॅटोचा वापर करून कियारा इतकी सुंदर स्किन मिळवते 

का आहे टोमॅटो इतकं फायदेशीर 

टोमॅटो विषयी इतकं सांगण्याचं कारण म्हणजे टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट्स असतात . त्याचसोबत टोमॅटो व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण आहे टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं तत्व आहे. ज्यामुळे सनबर्न पासून स्कीनचं सरंक्षण होत. हे सारे गुणधर्म स्किनला प्रोटेक्ट करण्यासोबत ग्लो वाढवण्यास सुद्धा मदत करतात . 
कियारा तर चेहऱ्यावर टोमॅटो पेस्ट लावते मात्र तुम्ही टोमॅटोमध्ये आणखी बरचं काही मिक्स करून ते वापरू शकता 

कसा बनवायचा फेस मास्क 

टोमटो फेसपॅक  दोन पद्धतींनी बनवू शकता . टोमॅटो बारीक पिसून त्यात कच्या बटाट्याची पेस्ट करून घालू शकता यात थोडं मध घाला आणि हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर वीस मिनिट लावून ठेवा त्यांनतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

टोमॅटो पेस्ट मध्ये बेसन आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता नंतर हळूहळू स्क्रब करून चेहरा स्वच्छ करू शकता 

असा बनवा स्क्रब 

ओट्स मध्यम आकारात पिसून टोमॅटो पेस्ट मध्ये मिक्स करा हवं असल्यास यात तुम्ही काकडीचा रस मिसळू शकता या पेस्ट ला चेहऱ्यावर लावा आणि स्क्रब प्रमाणे वापर करा . 

टोमॅटो डायरेक्ट स्किन वर घासू शकता किंवा चकत्या करून चेहऱ्यावर ठेऊ शकता.. 

तर मग हे आहेत टोमॅटोचे स्किनसाठी फायदे तर मग किचन मध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या टोमॅटोपासून सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवा तेही घरच्या घरी