Kitchen Tips : तूप बनवताना विड्याचं पान का वापरतात? फायदे वाचून व्हाल अवाक्, एकदा नक्की ट्राय करा!

Kitchen Tips News In Marathi : घरी तूप बनवणे अनेकांना कटकटीचे काम वाटते. पण काही छोट्या टिप्स फॉलो केल्या तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप बनवू शकता. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 26, 2023, 03:35 PM IST
Kitchen Tips : तूप बनवताना विड्याचं पान का वापरतात? फायदे वाचून व्हाल अवाक्, एकदा नक्की ट्राय करा!  title=
Kitchen Tips Homemade Ghee

Homemade Ghee Marathi Recipe :  शुद्ध तूप म्हणजे पारंपरिक भारतीय घराण्याची ओळख आहे. साध्या वरण- भातापासून ते अगदी बिर्याणीला दम देताना सुद्धा तूप वापरले जाते. यामुळे जेवणाला एक चविष्ट टच मिळण्यास मदत होते. नैवेद्याच्या पदार्थांमध्ये, गोड पदार्थांमध्ये, पोळीला लावून तर कोणाला वरण भातावर तुपाचे दोन-तीन थेंब हवेच असतात. जेवण्याची चव वाढवण्यासह तूप आरोग्याला सुद्धा खूप फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के समृद्ध आहे, तसेच अँटीऑक्सिडंट्स देखील मध्यम प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक संसर्ग रोखण्यास मदत करते. परंतु हे सर्व फायदे मिळविण्यासाठी तूप शुद्ध असणे आवश्यक आहे. जर तुम्हाल पण शुद्ध तुप घरी बनवायचे असेल तर तुम्हाला एक खास सिक्रेट माहित असणे आवश्यक आहे. घरी तूप सहज कसे बनवायचे ते पाहा...

तूप बनवण्याची तशी सोपी पद्धत सगळ्यांना माहितीय पण तुम्ही तुपामध्ये आणखी एक गोष्ट टाकलीत तर त्या तुपाला सुंदर सुगंध येतो शिवाय ज्यामुळे तूप चविष्ट होते ही गोष्ट आहे विड्याचे पान. बघायला गेले तर ही जुनी रेसीपी आहे. ज्यामुळे काही लोक आजही तुपामध्ये विड्याचे पान टाकतात. पण आता हे का टाकलं जाते आणि त्याचे फायदे काय आहे हे जाणून घेऊया... 

खरं तर विड्याची पानाची ओळख हे खायचं पान असं आहे. मग हे पान तुपात देखील टाकले जाते. कारण बरेच दिवस ठेवलेल्या दुधावरील सायीला जो वास येतो, तो वास हे पान टाकल्याने येत नाही. तसेच यामुळे तूप रवाळ आणि चवीला छान लागते. तसेच त्याला कोणताही वास राहत नाही. विड्याच्या पानामुळे तुपाला एक वेगळा आणि रवाळ सुगंध येईल. जो खाण्यासाठी चांगला लागतो आणि याचा जादुई फरकामुळे तुप बनवताना लोक विड्याचे पान तुपात टाकतात. 

घरी तूप बनवण्याची सोपी पद्धत 

- नेहमी फुल क्रीम दूध खरेदी करा.
- दूध उकळवा आणि खोलीच्या तापमानाला थंड करा.
- रोज दुधाची साय काढा आणि फ्रीजमध्ये हवाबंद डब्ब्यात ठेवा.
- 1/4 कप दही आणि साखर घालून मिक्स करा. दिवसभर खोलीच्या तपमानावर ठेवा. ते जाड आणि मऊ झाले होते. 
- एक कप पाणी घाला. हे पांढऱ्या लोण्यातून दुधाचा वास घालवण्यास मदत करते. एकदा मिसळून मग पाणी काढून टाका. 
- एक कढई घ्या आणि त्यात लोण्याचा गोळा तसेच सुपारी आणि तुळशीची पाने घाला. 
- लोणी वितळण्यास सुरवात होईल आणि लहान पांढरे कण तयार होतील.
- मंद आचेव सुमारे 10 मिनिटे शिजवल्यानंतर, पांढरे कण हलके सोनेरी तपकिरी रंगाचे होतील.
- हलका सोनेरी तपकिरी रंग दिसू लागल्यावर गॅस बंद करा आणि तुम्ही तयार असाल.