जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर..

मुंबईमध्ये आज पेट्रोल 76.15 रुपये आणि डिझेल 67.40 रुपये प्रति लीटर आहे.

Updated: Jul 4, 2019, 09:33 AM IST
जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर.. title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतींमध्ये उलथापालथ झाल्यानंतर देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळाला आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील पेट्रोल डिेझेलच्या किंमतीत घट पाहायला मिळत आहे. सलग सहा दिवसांच्या दर वाढीनंतर दोन दिवस दर स्थिर आहेत. गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोल डिझेलचे जुने दरच कायम राहीले. याआधी बुधवारी किंमतीत कोणता बदल झाला नव्हता. गुरुवारी दिल्लीत पेट्रोल 70 रुपये प्रति लीटर तर डिझेल 64.33 रुपये प्रति लीटर होते. 

मुंबईमध्ये आज पेट्रोल 76.15 रुपये आणि डिझेल 67.40 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 72.75 रुपये तर डिझेल 66.23 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 73.20 रुपये आणि डिझेल 67.97 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. 

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती देखील वाढल्या. भारत आपली तेलाची गरज भागविण्यासाठी साधारण 84 टक्के भागा आयात करतो. आंतरराष्ट्री बाजारात याच्या किंमती वाढल्या की देशातील पेट्रोल डिझेल सहीत पेट्रोल संदर्भातील उत्पादनांवर याचा परिणाम होतो.