जाणून घ्या आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

 पेट्रोलची किंमत गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहे.

Updated: Aug 13, 2019, 10:03 AM IST
जाणून घ्या आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

नवी दिल्ली : सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्यानंतर आज त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलची किंमत गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून या किंमती सलग कमी होताना किंवा स्थिर राहीलेल्या दिसत आहेत. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पेट्रोल-डिझेलची किंमत वाढली नाही. या महिन्यात पेट्रोल 90 पैसे तर डिझेल साधारण 60 पैशांनी स्वस्त झाले आहे. येणाऱ्या दिवसात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर हे क्रमश: 71.99 रुपये, 74.69 रुपये, 77.65 रुपये और 74.78 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. तर या चारही शहरांमध्ये डिझेलचे दर कमी होऊन क्रमश: 65.43 रुपये, 67.81 रुपये, 68.60 रुपये और 69.13 रुपये प्रति लीटर झाले आहेत. कच्च्या तेलाची मागणी कमी झाल्याने किंमती घसरल्याचे सांगण्यात येत आहे.