नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत कोणताच बदल झाला नाही. तर डिझेल 15 पैशांनी स्वस्त झाले आहे. या आर्थिक संकल्पात सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्युटी वाढवली होती. सोबत सेस देखील जोडण्यात आला. यानंतर पेट्रोल 2.45 रुपये आणि डिझेल 2.36 रुपये प्रति लीटर महाग झाले होते.
गुरुवारी दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 72.90 रुपये आणि डिझेलची किंमत 66.34 रुपये आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 78.52 रुपये तर डिझेल 69.53 रुपये आहे. कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोल 75.12 रुपये आणि डिझेल 70.07 रुपये, चेन्नईमध्ये एक लीटर पेट्रोल 75.70 रुपये आणि डिझेल 70.07 रुपये, नोएडामध्ये एक लीटर पेट्रोल 72.23 रुपये आणि डिझेल 65.42 रुपये प्रति लीटर आहे.