मुलींच्या शर्टाची बटणं डावीकडे का असतात? तुम्हाला माहीत आहे का यामागील कारण?

तुम्हाला माहित आहे की असे का केले जाते? यामागे कोणतं कारण असावं?

Updated: Jan 11, 2022, 02:49 PM IST
मुलींच्या शर्टाची बटणं डावीकडे का असतात? तुम्हाला माहीत आहे का यामागील कारण? title=

मुंबई : आपल्याला हे माहित आहे की, मुलं असो किंवा मुली दोघांची बरीचशी फॅशन आता एक सारखी झाली आहे. त्यामुळेच आपल्याला बाजारात युनीसेक्स गोष्टी पाहायला मिळताता. युनीसेक्स म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणीही ती गोष्ट वापरु शकतात. तसेच कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर मुलं जरी मुलींसारखे कपडे घालत नसले तरी मुली मात्र बऱ्याचदा मुलांसारखे कपडे घालतात. ज्यामध्ये शर्ट आणि टीशर्टचा समावेश आहे.

स्त्री आणि पुरुष दोघेही शर्ट घालतात आणि दोघांचे शर्ट जवळपास सारखेच असतात. पण, तुमच्या लक्षात आले आहे का की, महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात आणि पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला असतात.

परंतु तुम्हाला माहित आहे की असे का केले जाते? यामागे कोणतं कारण असावं? तर आम्ही तुम्हाला यामागील कारण सांगणार आहोत.

महिलांच्या शर्टाला डावीकडे बटणं का असतात?

यामागचं तसं नेमकं कारण सांगणं कठीण आहे,  हे आजपासून नाही तर अनेक शतकांपासून होत आहे हे मात्र निश्चित. रीडर्स डायजेस्टमधील एका अहवालानुसार, महिलांच्या शर्टच्या डाव्या बाजूला बटणं असल्याचे अनेक सिद्धांत आहेत.

अहवालानुसार 13व्या शतकात ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता त्यांनाच शर्ट परवडत होता. तर सामान्य लोक कपडे बांधूनच आपलं काम चालवायचे. आता हे लक्षात घ्या की, त्यावेळेला या पैसेवाल्या महिलांना कपडे घालण्यासाठी किंवा त्यांचं काम करण्यासाठी दुसऱ्या महिलांना ठेवलं जायचं, जसे की दासी किंवा मोलकरणी. या महिला त्या मोठ्या महिलांना कपडे घालायच्या ज्यामुळे त्यांना  डाव्या बाजूने कपडे घालण्यासाठी सोपं व्हायचं, ज्यामुळे महिलांची बटणं डाव्या बाजूला असतात. तर पुरुष आपलं काम स्वत: करायचे ज्यामुळे त्यांना उजव्या हाताने काम करणं सोप व्हावं म्हणून ही बटणं उडवीकडे होती.

गार्डियनमधील एका अहवालात फॅशन इतिहासकारांद्वारे असेही म्हटले आहे की, इतर लोकं महिलांना कपडे घालत असल्यामुळे ही बटणं डाव्या बाजूला ठेवली गेली. याशिवाय इतर इतिहासकारांचे असे मत आहे की, यामागील कारण हे देखील असू शकते की, स्त्रियांना मुलांना स्तनपान करावे लागते आणि बहुतेक स्त्रिया डाव्या बाजूला जास्त स्तनपान करतात. म्हणूनच बटण डाव्या बाजूला ठेवले गेले होते.

याशिवाय, असाही एक सिद्धांत आहे की, पुरुष अनेकदा युद्धात भाग घेतात आणि डाव्या बाजूला बंदूक किंवा तलवारी ठेवत असत. त्यानुसार कपड्यांची रचना करण्यात आली आणि त्यामुळे पुरुषांच्या सोयीसाठी त्यांना उजव्या बाजूला बटणं लावण्यात आले आहेत. असे देखील सांगण्यात येते.

तसेच उजव्या बाजूला बटणं असणे सोयीचे असते आणि पुरुष प्रधान समाज असल्यामुळे पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला ठेवली जात होती, असे अनेक सिद्धांतांमध्ये म्हटलं आहे. याशिवाय महिला आणि पुरुषांचे कपडे सारखे असले तरी या बदलामुळेही थोडासा फरक पडू शकतो, त्यामुळे महिलांच्या कपड्यांमध्ये बटणाची बाजू बदलण्यात आली आहे.