कोलकाता : कोलकात्यातील प्रसिद्ध एलआयसी इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय.
कोलकात्याच्या जवाहर लाल नेहरु रोडवर ही इमारत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी हजर झाल्यात.
#WATCH: Fire continues to rage at LIC building on Jawahar Lal Nehru road in #Kolkata. 10 fire tenders working to douse the fire. #WestBengal pic.twitter.com/QWGgYy4mYL
— ANI (@ANI) October 19, 2017
गुरुवारी सकाळी साधारणत: १०:३० वाजता ही आग लागल्याचं समजतंय. चार - पाच उलटल्यानंतरही ही आग आटोक्यात येत नव्हती.
इमारत भलतीच उंच असल्यानं अग्निशमन दलाला क्रेनचाही वापर करावा लागतोय. न्यूज एजन्सी 'एएनआय'नं या घटनेचा एक व्हिडिओही जाहीर केलाय. या व्हिडिओत इमारतीतून उंचावर धूर निघाल्याचं दिसतंय. इमारतीतले सर्वात वरचे तीन मजले आगीनं वेढलेले दिसत आहेत... आणि ही आग हळूहळू पसरताना दिसतेय.
शहरात ही इमारत जीवन दीप इमारतीच्या नावानं प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या निमित्तानं इथल्या कार्यालयांत जास्त लोक हजर नव्हते... आणि जे लोक कार्यालयात होते त्यांना पोलिसांनी सुखरुप बाहेर काढल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.