Who Is Kabita Sarkar: कोलकातात आरजी कर मेडिकल रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार आणि रेप करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली (Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case). या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय रॉय(Sanjay Roy) असं या नराधमाचं नाव आहे. आता कोर्टात आपला पक्ष मांडण्यासाठी आरोपी संजय रॉयला सरकारी वकिल देण्यात आला आहे. याआधी कोर्टाने संजय रॉयला 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावली आहे. आरोपी संजय रॉयला महिला सरकारी वकिल देण्यात आली असून कबिता सरकार (Kabita Sarkar) असं तिचं नाव आहे.
आरोपी संजय रॉय याचं वकिलपत्र घेण्यास कोणीच वकिल तयार झालं नाही. चौकशीदरम्यान संजय रॉय पोलिसांना अतिशय उद्धट उत्तर देत असून त्याच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसत नाहीए. त्यामुळे वकिलांनीही त्याचं वकिलपत्र घेण्यात नकार दिलाय. अशात आरोपीचा पक्ष मांडण्यासाठी कबिता सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहे कबिता सरकार?
कबिता सरकार या 52 वर्षांच्या असून गेली 25 वर्ष त्या वकिली करतायत. वकिलीच्या कारकिर्दीतल सर्वात आव्हानात्मक प्रकरणाला सामोरं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. कबिता सरकार यांनी हुगली मोहसिन कॉलमध्ये वकिलीच पदवी मिळवली. दिवाणी खटल्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी अलिपूर न्यायालयात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. फौजदारी कायद्यातील तिच्या कौशल्यामुळे, फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांची राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (SALSA) वकील म्हणून निवड केली. जून 2023 मध्ये त्यांनी सियालदह न्यायालयात काम सुरु केलं. या न्यायालयात राज्य विधी प्राधिकरणाच्या त्या एकमेव स्थायी वकील आहेत. कबिता सरकार यांनी न्यायालयात आवश्यक कागदपत्रे दाखल केली असून खटला लढण्याची परवानगी मागितली आहे.
केस लढवण्याचं कारण?
एका पेपरला दिलेल्या मुलाखतीत वकिल कबिता सरकार यांनी कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणातील आरोपीचं वकिलपत्र घेण्याचं कारण सांगितलं. न्यायालय न्यायावर विश्वास ठेवते आणि कायदेशीर यंत्रणा आरोपीसह प्रत्येक व्यक्तीच्या न्यायालयात आपली बाजू मांडण्याचं हक्क असल्याचं त्यांनी सांगतिलं. कबिता सरकार यांचा फाशी सारख्या शिक्षेला विरोध आहे. कठोर शिक्षा म्हणून आरोपीला जन्मठेप देण्यात यावी असं कबिता सरकार यांचं मत आहे. 'आरोपी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष' या सिद्धांतावर त्या भर देतात.
काय आहे प्रकरण?
कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये 8-9 ऑगस्ट 2024 मध्ये 31 वर्षांच्या एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. महिला डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या प्रकरणानंतर कोलकात्याबरोबरच संपूर्ण देशात संतापची लाट पसरली. देशभरातील डॉक्टरांनी या घटनेविरोधात बंद पुकारला होता.
महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या करणारा हा आरजी कर रुग्णालयातील कर्मचारी होता. संजय रॉय असं या आरोपीचं नाव असून रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टर एकटी असल्याची संधी साधत त्याने घृणास्पद कृत्य केलं.