बंगळुरु : कुमारस्वामी आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. येडियुरप्पांना बहुमताचा आकडा गाठता न आल्याने त्यांनी बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 3 दिवसात येडियुरप्पा यांचं सरकार पडलं. मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. तर सर्वात छोटा पक्ष असूनही जेडीएस सत्तेत जाणार आहे. काँग्रेसने जेडीएसला समर्थन दिल्यानंतर कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुमारस्वामी यांच्या बद्दल बोललं जातं की, अचानक राजकारणात आलेले कुमारस्वामी यांना सिनेमामध्ये काम करायची आधी इच्छा होती. कुमारस्वामी यांचा जन्म हासन जिल्ह्यामध्ये झाला होता. कन्नड अभिनेता डॉ. राजकुमार यांचं प्रशंसक कुमारस्वामी आपल्या कॉलेजच्या दिवसात सिनेमाकडे आकर्षित झाले होते. त्यानंतर ते सिनेनिर्माता आणि डिस्ट्रीब्युशनच्या व्यवसायात आले. त्य़ांनी अनेक कन्नड सिनेमा बनवले. ज्यामध्ये निखिल गौडा यांची भूमिका असणारा ‘जगुआर’चा देखील समावेश आहे. कुमारस्वामी यांचा राजकारणात प्रवेश 1996 मध्ये झाला. कनकपुरा येथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर 2004 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली.
2006 च्या सुरुवातीला कुमारस्वामी यांनी पक्षासाठी धोका असल्याचं सांगत देवेगौडा यांच्या विरोधात जावून सिंह सरकारचं समर्थन काढून घेतलं. कुमारस्वामी यांनी या नंतर भाजपच्या समर्थनाने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री बनले. कुमारस्वामी यांचं वर्चस्व यानंतर पक्षात वाढलं. यानंतर त्यांच्या कुटुंबात वाद झाला. कारण त्यावेळी मोठा भाऊ एच.डी रेवन्ना यांना गौडांचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. यानंतर पक्षातील वरिष्ठ नेता सिद्धरमैया यांना देखील हे जाणवलं आणि त्यानंतर पक्षानंतर कुमारस्वामींच्या विरोधातील गोष्टी केल्याच्या आरोपाखाली त्यांना देखील जेडीएस मधून काढून टाकण्यात आलं होतं.