Girl Writes With Both Hands: बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात कधी कधी असे काही दाखवतात की आपला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम्हाला तो अभिनेता अमिर खानचा () '3 इडियस' (3 idios) चित्रपट आवडतो का त्यातील Virus म्हणजे अभिनेता बोमन ईरानी (Boman Irani) कसा दोन्ही हाताने भराभरा लिहतो. पण हा तर चित्रपट आहे खऱ्या आयुष्यात थोडी असं घडतं. तर थांबा आज आम्ही तुम्हाला Lady Virus ला भेटवणार आहोत. हो अगदी बरोबर खऱ्याखुऱ्या आयुष्यात एक मुलगी दोन्ही हाताने भराभरा लिहिते. एवढंच नाही ना तरी तिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
या लेडी वायरसचा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या तरुणीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पहिले तुम्ही हा व्हिडीओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की जगात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. (Lady Virus Aadi Swaroopa can write with both hands video viral on Social media nmp)
Ambidexterity world record holder Aadi Swaroopa from India. She writes 45 words per minute… pic.twitter.com/1ynxIpfDJZ
— Tansu YEĞEN (@TansuYegen) October 13, 2022
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी ब्लॅक बोर्डवर एकाच वेळी दोन्ही हातांनी प्रचंड वेगाने लिहितेय. ही मुलगी हिंदी, इंग्रजी, कन्नड शा अनेक भाषांमध्ये लिहू शकते. हा व्हिडीओ ट्विटरवर Tansu YEGEN या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अॅम्बिडेक्सटेरिटी वर्ल्ड रेकॉर्ड (Ambidexterity world record) धारक भारतातील आदि स्वरूपा. ती प्रति मिनिट 45 शब्द लिहिते...मंगळुरुची आदि स्वरूपा (Aadi Swaroopa) असं या मुलीचं नाव आहे.
Mangaluru: 16-year-old Aadi Swaroopa can write with both hands at the same time. "I can write in English, Kannada at same time. I also do mimicry, singing," she says.
Her mother says practice made her proficient & she can write 45 words in a minute with both hands. #Karnataka pic.twitter.com/ImU6HWer7Z
— ANI (@ANI) September 15, 2020
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्स मुलीचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. मुलीचं टॅलेन्ट पाहून बहुतेकांना धक्का बसला आहे. या मुलीने देशाची मान अभिमानाने उंचवली आहे, असं यूजर्सचं म्हणं आहे.