जाणून घ्या कोण आहे तेजप्रताप यादव यांची भावी पत्नी....

गेल्या कित्येक दिवसांपासून राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या नियोजित लग्नाच्या चर्चा होत आहेत. तेज प्रताप यांना त्यांची भावी पत्नी सापडलीय... आणि याच वर्षी ते विवाह बंधनात अडकणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर कोण आहे त्यांची भावी पत्नी? याविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

Updated: Apr 5, 2018, 11:40 PM IST
जाणून घ्या कोण आहे तेजप्रताप यादव यांची भावी पत्नी....

पाटणा : गेल्या कित्येक दिवसांपासून राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या नियोजित लग्नाच्या चर्चा होत आहेत. तेज प्रताप यांना त्यांची भावी पत्नी सापडलीय... आणि याच वर्षी ते विवाह बंधनात अडकणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर कोण आहे त्यांची भावी पत्नी? याविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी तेज प्रताप यादव यांचा साखरपुडा होणार आहे आणि लगेचच पुढच्या महिन्यात म्हणजेच मे मध्ये त्यांचा विवाह पार पडू शकतो. 

तेज प्रताप यांची भावी वधू कोण आहे? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर निश्चित झालंय. तेज प्रताप यांचा विवाह चंद्रिका राय यांच्या मुलीशी म्हणजेच ऐश्वर्या राय यांच्याशी होणार आहे. या बातमीवर आता चंद्रिका राय यांनीही शिक्कामोर्तब केलंय. 

चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांचे सुपूत्र आहेत. चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या यांनी आपलं शालेय शिक्षण पाटणाहून पूर्ण केलंय. तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलंय.  
 
आपल्या मोठ्या मुलाच्या साखरपुड्यात आणि लग्न समारंभात आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव सहभागी होणार की नाही? या मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारा घोटाळ्यात दोषी ठरवल्यानंतर ते रुग्णालयात भरती झालेत.

तेजप्रताप - ऐश्वर्या यांच्या १८ एप्रिल रोजी होणाऱ्या साखरपुड्यासाठी पाटण्याचं मौर्य बुक करण्यात आलंय.