Kerala Wayanad Landslide : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असून, 60 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तर 70 लोक जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकांसह 225 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने तीन मुलांसह 41 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ ही घटना घडली.
The death toll in the Wayanad landslides has risen to 8. Those dead also include three children.
The first landslide was reported at nearly 2 am. Later, at nearly 4.10 am, the district was struck by another landslide. #WayanadLandslide #Wayanad #Kerala pic.twitter.com/TCAWfMdaCz
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 30, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजता या भागात पहिला भूस्खलन झालं. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन झाला. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामला आणि नूलपुझा गावांना भूस्खलनाचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये मिळणार आहेत.
Horrible visuals of landslide coming in from Meppadi, Wayanad.#Wayanad #Landslide #Kerala pic.twitter.com/4DHZYV7Ciu
— West Coast Weatherman (@RainTracker) July 30, 2024
अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत, अतिरिक्त NDRF टीम वायनाडला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिलीय.
Distressed by the landslides in parts of Wayanad. My thoughts are with all those who have lost their loved ones and prayers with those injured.
Rescue ops are currently underway to assist all those affected. Spoke to Kerala CM Shri @pinarayivijayan and also assured all possible…
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एक एएलएच, बचाव कार्यासाठी सुलूरमधून रवाना झाले आहेत. किमान 50 लोक मेपाडीमधील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
#BREAKING : Five people, including two children, were confirmed to have died in landslides that hit Kerala's hilly Wayanad district #Kerala #Waynad #landslide #Mundakkai #NDRF #Rescue pic.twitter.com/qeZvwFzGU9
— mishikasingh (@mishika_singh) July 30, 2024
वेस्ट कोस्ट वेदरमनने X वर शेअर केलेल्या कथित व्हिडीओमध्ये जिल्ह्यातील भूस्खलनाचे ठिकाण दाखवलंय. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) च्या फेसबुक पोस्टनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
#Meppadi, area near #Wayanad, where a landslide occurred Rainfall in 5 days should be more than 70 cm, which is conducive for landslides.
Instead of going among his people and providing relief and asking about their well-being, RaGa is distributing Halwa. #KeralaRains#Kerala pic.twitter.com/j5wZqtcY0l
— श्रवण बिश्नोई (किसान) (@SharwanKumarBi7) July 30, 2024
दरम्यान एका निवेदनात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले आहे की, 'वायनाडमधील भूस्खलनावर सर्व संभाव्य बचाव कार्यात समन्वय साधला जाईल. आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यापासून सरकारी यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. मंत्री वायनाडला भेट देतील आणि उपक्रमांचे नेतृत्व करतील.'
The area near #Meppadi, #Wayanad, where a major landslide occurred, received 40cm of rain (#Kalladi) in the last 4 days, excluding yesterday’s rainfall. The total rainfall should be over 70cm in 5 days, making it favorable for landslides. VC: zainsvlogs #KeralaRains#Kerala pic.twitter.com/I2a3VooP6t
— Jeev Dain Varughese (@jeev_dain) July 30, 2024
वायनाडचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनाने मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे अजूनही अडकले आहेत त्यांची लवकरच सुखरूप सुटका होईल.'
I am deeply anguished by the massive landslides near Meppadi in Wayanad. My heartfelt condolences go out to the bereaved families who have lost their loved ones. I hope those still trapped are brought to safety soon.
I have spoken to the Kerala Chief Minister and the Wayanad…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 30, 2024
दरम्यान, दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. आपत्कालीन मदतीसाठी 9656938689 आणि 8086010833 हे हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.