आयटी रिटर्न्स भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल, तर आज रात्री १२ वाजेपर्यंत तो भरता येणार आहे.

Updated: Jul 31, 2017, 08:31 AM IST
आयटी रिटर्न्स भरण्याचा आजचा शेवटचा दिवस title=

नवी दिल्ली : 2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल, तर आज रात्री १२ वाजेपर्यंत तो भरता येणार आहे. ज्यांना आयकर भरायचा आहे त्यांनाही आज मध्यरात्रीपर्यंत भरता येणार आहे. उद्या म्हणजे १ ऑगस्टनंतर आयकर भरल्यास त्यावर अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे विना दंड आज आयकर भरण्याची शेवटची संधी आहे. 

केंद्रीय आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा २ कोटी लोकांनी आतापर्यंत ऑनलाईन आयकर परतावा भरला आहे. शिवाय आयकर विभागाच्या ऑनलाईन परतावा भरण्याच्या वेबसाईटवर परतावा भरते वेळी कोणतीही अडथळा येत नसल्याचंही आयकर विभागानं स्पष्ट केलंय. 

त्यामुळे यंदा आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय. त्यामुळे तुम्हाला आयकर परतावा भरायचा असेल, तर incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर भरता येणार आहे.