Renukaswamy Murder: अंगावर एकही कपडा नाही, डोळ्यात अश्रू अन् ट्रकच्या...; दर्शनच्या चाहत्याचे हत्येपूर्वीचे अखेरचे क्षण आले समोर

Renukaswamy Murder: दोन्ही फोटोंमध्ये रेणुकास्वामीच्या (Renukaswamy) अंगावर शर्ट दिसत नाही आहे. यादरम्यान त्याच्या मागे ट्रक पार्क केलेले दिसत आहे. त्याच्या शरिरावरील जखमाही फोटोत दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 5, 2024, 12:11 PM IST
Renukaswamy Murder: अंगावर एकही कपडा नाही, डोळ्यात अश्रू अन् ट्रकच्या...; दर्शनच्या चाहत्याचे हत्येपूर्वीचे अखेरचे क्षण आले समोर title=

Renukaswamy Murder: कन्नड अभिनेता दर्शनच्या आदेशावरुन हत्या करण्यात आलेल्या 33 वर्षीय ऑटो ड्रायव्हर रेणुकास्वामीचे नवे फोटो समोर आले आहेत. जूनमध्ये रेणुकास्वामीची हत्या करण्यात आली होती. त्याचे हे फोटो हत्या करण्यापूर्वीच्या काही वेळ आधी काढण्यात आले आहेत. एका फोटोत रेणुकास्वामी कॅमेऱ्यात पाहताना दिसत आहे. यावेळी त्याच्या शरिरावर कपडे नसून उघडा बसलेला दिसत आहे. यादरम्यान तो प्रचंड घाबरलेला असून  रडत आहे, तसंच आपल्या जीवासाठी भीक मागत आहे.

दोन्ही फोटोंमध्ये रेणुकास्वामीच्या (Renukaswamy) अंगावर शर्ट दिसत नाही आहे. यादरम्यान एका फोटोत त्याच्या मागे ट्रक पार्क केलेले दिसत आहे. त्याच्या शरिरावरील जखमाही फोटोत दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तो जमिनीवर खाली पडलेला दिसत आहे. 8 जून रोजी बंगळुरुमधील फ्लायओव्हरजवळ रेणुकास्वामीचा मृतदेह आढळला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनचा चाहता असणाऱ्या 33 वर्षीय रेणुकास्वामीचं अपहरण करुन नंतर निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती. दर्शनने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. रेणुकास्वामी अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील संदेश पाठवत असल्याने दर्शनने हा आदेश दिला होता. कथितरित्या दर्शन आणि पवित्रा यांच्यात प्रेमसंबंध आहेत. 

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, रेणुकास्वामीवर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता. अनेक बोथट जखमा झाल्याने बसलेला धक्का आणि रक्तस्त्राव यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आलं आहे. दरम्यान हत्येपूर्वी त्याला विजेचे शॉकही देण्यात आल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. या हत्येप्रकरणी दर्शन आणि पवित्रा गौडा यांच्यासह 15 जणांना अटक कऱण्यात आली आहे. 

दर्शनला अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडी 9 सप्टेंबरला संपत आहे. बंगळुरु पोलिसांनी हत्येप्ररकरणी स्थानिक न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून त्याने आता हे फोटो समोर आले आहेत.  चार्जशीटमध्ये सुमारे 230 पुराव्यांचा समावेश आहे. आरोपपत्रानुसार दर्शनच्या कपड्यांवर तसेच पवित्रा गौडाच्या चपलांवर रक्ताचे डाग आढळून आले.