पॅन आधार लिंक करण्यासाठी आता उरले फक्त ४८ तास; गांभिर्याने घ्या अन्यथा सर्व व्यवहार खोळंबतील...

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे.

Updated: Mar 29, 2022, 10:31 AM IST
पॅन आधार लिंक करण्यासाठी आता उरले फक्त ४८ तास; गांभिर्याने घ्या अन्यथा सर्व व्यवहार खोळंबतील... title=

मुंबई : पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. २०१७ मध्ये पॅन आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ३१ एप्रिलपर्यंत मात्र ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

पॅन-आधार लिंक नसेल तर काय होईल?

  1. ३१ तारखेनंतर पॅन अवैध ठरेल
  2. पॅन अवैध ठरल्यास बँकेच्या व्यवहारांमध्ये मोठा अडथळे येऊ शकतात
  3. नव्यानं पॅन काढावा लागेल, हा पॅन सगळ्या बँक खात्यांशी जोडावा
  4. आयकर परतावा भरला नाही तर गृहकर्ज मिळवणे कठीण
  5. तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही
  6. पॅन-आधार लिंक नसेल शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाही

अनेक अनिवासी भारतीयांकडे आधार कार्ड नाही, अशांच्या अडचणी वाढणार

प्रामुख्यानं ज्या एनआरआय लोकांकडे पॅन आहे. पण आधार कार्ड काढणे कायद्यात बसत नाही, अशांसाठी ही प्रक्रिया फारच जिकीरीची होणार आहे. एनआरआय जर भविष्यात भारतात आले आणि त्यांची बँक खाती एनआरओ प्रकारची नसतील, तर त्यांच्या सामान्य खात्यातील रकमांचे व्यवहार ठप्प होतील.

शिवाय भविष्यात त्यांना पॅन काढताना देखील अडचणी येऊ शकतात. सरकारनं याविषयी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं कर विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Pan-Aadhar ला कसे कराल ऑनलाईन लिंक

आधार पॅनला एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल. याचा एक फॉरमॅट निश्चित केला आहे यूआयडीएपीएन (१२ अंकी-आधार क्रमांक) स्पेस (१० अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा. एखाद्याचा आधार कार्ड नंबर  ABCD12345678 आहे व  पॅन कार्ड क्रमांक  XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS  करताना हा फॉरमॅट "ABCD12345678 WXYZ123456" असा  असेल.

किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकता.

लिंक आहे की नाही असे तपासा?

तुम्ही आधार पॅन लिंक केले असेल परंतू तुम्हाला ते लक्षात नसेल तर आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तपासू शकता. तुम्ही तुमचे आधार पॅन लिंक आहे की नाही. हे पाहण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status या लिंक वर क्लिक करा आणि चेक करा. त्यानंतर जर तुमचे आधार पॅन लिंक असेल तर तसा संदेश प्राप्त होईल.