'या' कंपनीत शिरला बिबट्या...

एखाद्या सोसायटीत किंवा रहिवासी परिसरात बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 5, 2017, 08:12 PM IST
'या' कंपनीत शिरला बिबट्या...  title=

गुडगाव : एखाद्या सोसायटीत किंवा रहिवासी परिसरात बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. मात्र कधी कंपनीत बिबट्या शिरल्याचे तुम्ही ऐकले आहे ? तर अशी एक घटना गुडगाव येथे घडली आहे. गुरुवारी सकाळी गुडगावच्या मानेसर येथील मारुती सुझुकी कंपनीमध्ये बिबट्या शिरला. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. बिबट्या इंजिन विभागात शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. 

बिबट्या शिरल्याची बातमी कळताच पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज बघून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

बिबट्या कंपनीच्या इंजिन विभागात गेल्यामुळे कंपनीचे काम थांबवण्यात आले. आम्ही बिबट्याला शोधतो आहोत. मात्र, त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.