आपल्या कष्टाचा पैसा गुंतवण्यासाठी LIC च्या बेस्ट पॉलिसी; कुटूंबाच्या सुरक्षित भविष्याचा उत्तम पर्याय

आपला कष्टाचा पैसा नेमका कोणत्या विमा योजनेत गुंतवावा असा विचार तुमच्या मनात आला असेल तर, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (LIC)चा विचार तुम्ही करू शकता

Updated: Mar 26, 2021, 01:54 PM IST
आपल्या कष्टाचा पैसा गुंतवण्यासाठी LIC च्या बेस्ट पॉलिसी; कुटूंबाच्या सुरक्षित भविष्याचा उत्तम पर्याय title=

नवी दिल्ली : आयुष्य जगत असताना नेहमी सुरक्षितेतेचा विचार आपण करीत असतो. आपले आणि आपल्या कुटंबाचे भविष्य सुरक्षित करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. त्यामुळे आपल्याकडे उत्तम कंपनी किंवा संस्थेचा विमा असावा असे आपल्याला वाटते. परंतु आपल्या अडचणीच्या वेळी खरोखर कामी येणारा सुरक्षित विमा कोणता? असा विचार आपण करीत असतो. 

आपला कष्टाचा पैसा नेमका कोणत्या विमा योजनेत गुंतवावा असा विचार तुमच्या मनात आला असेल तर, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (LIC)चा विचार तुम्ही करू शकता. परंतु LIC च्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी. जेणे करून तुमच्या कुटूंबाचे भविष्य सुरक्षित राहू  शकेल ते पाहूया याबाबत पाहूया  

कन्यादान पॉलिसी (Kanyadan Policy)

LIC च्या टॉपच्या 5 पॉलिसीबद्दल विचार केल्यास पहिल्या स्थानावर LIC जीवन लक्ष पॉलिसी होऊ शकते. नावाप्रमाणेच या पॉलिसीमध्ये लक्ष ठरवण्यात येते. तुम्ही एखाद्या लक्ष समोर ठेऊन ते पुर्ण करण्यासाठी या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता.

ही पॉलिसी टर्म राइडट आणि एक्सिडेंटल डेथ एंड डिसेबलिटी राइडर सोबत घेता येऊ शकते. या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम माफ केला जातो आणि मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यास पॉलिसीचे पैसे मिळतात. 

विमाधारकाच्या मृत्यूनंतर एश्योर्डचा 10 टक्के वाटा दरवर्षी वारसदाराला दिला जातो. ही पॉलिसी कन्यादान पॉलिसी म्हणून देखील प्रचलित आहे. 

जीवन उमंग पॉलिसी (Jeevan Umang Policy)

LIC ची ही योजना आजीवन विमा योजना आहे. या योजनेला भागिदारी योजना देखील म्हणतात. कारण यामध्ये अंतिम अतिरिक्त बोनसदेखील मिळतो. 

यामध्ये या योजनेचा लाभ 100 वर्षापर्यंत मिळतो. तुम्ही 100 वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास तुम्हाला मोठी मॅच्युरिटी मिळू शकते. 

या आधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसदारांना या पॉलिसीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळू शकतो. 

 
जीवन लाभ पॉलिसी (Life benefit policy)

तुम्हाला पैसे गुंतवणूक अधिकचा परतावा हवा असेल. तर ही योजना तुमच्या कामाची आहे. या पॉलिसीमधून परतावा उत्तम मिळू शकतो.  या पॉलिसीला टर्म आणि एक्सिडेंटल डेथ राइडरसोबत घेण्याचा सल्ला दिला जातो.

पॉलिसी  जीवन  आनंद ( Life Jeevan Anand)

ही पॉलिसी LIC मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसीमधील एक पॉलिसी आहे. ज्यामध्ये ठराविक वेळेत मॅच्युरिटी मिळते. ज्या लोकांना पॉलिसीची मॅच्युरिटी देखील हवी आहे आणि सोबतच काही रक्कम पुन्हा ठेवी म्हणून मागे ठेवायची आहे. त्यांच्यासाठी ही उत्तम पॉलिसी आहे.

जीवन शांति पॉलिसी (Jeevan Shanti Policy) 

एक आणखी उत्तम पॉलिसी आहे. जिचे नाव आहे, जीवन शांति पॉलिसी! ही त्या लोकांसाठी आहे, ज्यांना नियमित उत्पन्न हवे आहे. अर्थात भविष्यात ज्यांना पेन्शन हवे आहे. ही एक सिंगल प्रीमियम पॉलिसी आहे. जी नियमित उत्पन्न देत असते.