कामाची बातमी! तुम्हाला अलिकडेच COVID ची बाधा झाली का? जाणून घ्या जीवन विम्याचे बदललेले नियम

Life Insurance new Rule जर तुम्हाला अलीकडेच कोविड झाला असेल, तर त्यानंतर तुम्हाला जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी किमान 3 महिने वाट पाहवी लागणार आहे.

Updated: Jan 16, 2022, 10:30 AM IST
कामाची बातमी! तुम्हाला अलिकडेच COVID ची बाधा झाली का? जाणून घ्या जीवन विम्याचे बदललेले नियम title=

मुंबई : देशात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे दिवसाला 2 लाखाहून अधिक रुग्ण नव्याने बाधीत होत आहेत. कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता आयुर्विमा पॉलिसीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. तुम्हाला अलीकडेच कोविड झाला असेल, तर त्यानंतर तुम्हाला जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी किमान 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. नवीन नियमांनुसार आयुर्विमा कंपन्यांनी वेटिंग पिरियड 3 महिन्यांपर्यंत केला आहे. जेव्हा एखादा रुग्ण आजारातून बरा झाल्यानंतर परत येतो, त्यानंतर आरोग्य विमा किंवा जीवन विमा घेण्यासाठी 3 महिने वाट पाहावी लागणार आहे.

३ महिने का थांबायचे?
3 महिन्‍यांच्‍या प्रतिक्षेनंतर, आयुर्विमा कंपन्‍या तोट्याच्‍या शक्यतांचे योग्य आकलन करतात. री इंश्योरंस कंपन्यांनी लाइफ इंश्योरंस कंपन्यांना सांगितले की, कोरोना बाधित रुग्णांनाही प्रतीक्षा कालावधीचा नियम लागू करावा. त्यानंतर विमा कंपन्यांनी नवीन नियम लागू केला आहे.

कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, अशा परिस्थितीत आयुर्विमा दाव्यांच्या संख्या वाढली आहे. यामुळे विमा कंपन्यांनी त्यांचे नियम बदलले आहेत.

एलआयसीच्या पुनर्विमा(Reinsurance)प्रीमियममध्ये मोठी वाढ
2020-21 या आर्थिक वर्षात आयुर्विमा महामंडळाने 442 कोटी रुपये पुनर्विमा प्रीमियम म्हणून जमा केले आहेत. मागील आर्थिक वर्षात म्हणजेच 2019-20 मध्ये, LIC ने प्रीमियम म्हणून 327 कोटी रुपये जमा केले होते.